संजय बंदपट्टे यांचा स्तुत्य उपक्रम – डॉ.प्रणिताताई भालके

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपुरात लसीकरण मोहीम संपन्न
राष्ट्रवादीचे शहर कार्यकारी अध्यक्ष संजय बंदपट्टे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.   ते नेहमी सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून येतात. त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या जननी राजमाता राष्ट्रमाता मॉंसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये भव्य लसीकरण मोहीम राबविली असून सदरचा उपक्रम स्तुत्य असून त्यांनी यापुढेही असेच सामाजिक कार्यात अग्रेसर रहावे, अशा शुभेच्छा विठ्ठल परिवाराच्या नेत्या डॉ.सौ. प्रणिताताई भगीरथदादा भालके यांनी दिल्या.
या कार्यक्रमास मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, विधानसभा अध्यक्ष संदिप मांडवे, समता परिषदेचे अनिल अभंगराव, माजी नगरसेवक किरण घाडगे, महम्मद उस्ताद, मी वडार महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले, सोमनाथ देवकर, अण्णा बंदपट्टे देविदास शेळके , राष्ट्रवादी ओबीसी सेल शहराध्यक्ष अनिल सप्ताळ, गौतम शिंदे, धनंजय पवार, नितीन धोत्रे, अक्षय मुंडेकर, निखिल माने, लखन बंदपट्टे हनुमंत देवकर, विशाल धोत्रे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रभाग क्र.11 मधील जनतेने खूप प्रतिसाद दिला. यावेळी सुमारे 200 पेक्षा जास्त नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
यावेळी शहर कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे म्हणाले की, कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करावे असे आवाहन केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here