संजय (आण्णा)क्षीरसागर जात पडताळणी समितीचा दिलासा (आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्णपणे विश्वास आहे संजय आण्णा क्षिरसागर)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

संजय (आण्णा)क्षीरसागर जात पडताळणी समितीचा दिलासा
(आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्णपणे विश्वास आहे संजय आण्णा क्षिरसागर)

मोहोळ येथील भाजप नेते संजय क्षिरसागर यांच्या विरोधात जि.प. सदस्य शिवाजी सोनवणे व कांग्रेस मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात येणकी यांनी दाखल केलेली तक्रार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ९ सप्टेंबर रोजी निकालात काढली. त्यामुळे संजय क्षिरसागर यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे शिवाजी सोनवणे यांनी स्पष्ट केले.

या बाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील भाजप नेते संजय आण्णा क्षिरसागर यांनी तहसीलदार मोहोळ यांचेकडून दाखला मिळालेला असताना उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. १ यांचेकडून दुसरा जातीचा दाखला मिळवला आहे. कुटुंबातील पूर्वी जातीचे दाखला रद्द झाल्याची माहिती पडताळणी समिती न देता माहिती लपवून दूसरा जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र बेकायदेशीरपणे मिळविल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे व गौरव खरात यांनी २४ मे २०२१ रोजी संजय क्षीरसागर यांचा जातीचा व वैधता दाखला रद्द व जप्त करण्याची मागणी जिल्हा जात पडताळणी समितीकडे केली होती.

या संदर्भात जातपडताळणी समितीकडे सुनावणी सुरु होती. सुनावणी दरम्यान तक्रारदार शिवाजी सोनवणे व गौरव खरात यांनी आपली बाजू मांडली होती. मात्र पडताळणी समितीने यापूर्वी एका प्रकरणात संजय क्षिरसागर यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे “महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग अधिनियम २००० चे कलम ७(२) नुसार समितीने घेतलेला निर्णय अंतिम असून त्यास भारतीय संविधानातील कलम २२६ अन्वये उच्च न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागता येते अशी तरतूद आहे. त्यामुळे समितीने घेतलेल्या निर्णयांमध्ये पुनर्विलोकनाची तरतूद नसून तसे समितीस अधिकार नाहीत” असे निरीक्षण नोंदवत जिल्हा जात पडताळणी समितीने तक्रारदार शिवाजी सोनवणे व गौरव खरात यांची तक्रारी अर्ज ९ सप्टेंबर २१ रोजी निकालात काढला आहे. या आदेशामुळे संजय क्षिरसागर यांना सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दिलासा मिळाला आहे. तर शिवाजी सोनवणे व गौरव खरात यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.

 

 

कोट:
माझ्या जातीच्या संदर्भात शिवाजी सोनवणे आणि गौरव खरात यांनी तक्रार दाखल केली होती. पडताळणी समितीला मी माझ्या सन १९०४ पासुनचे सख्खे पणजोबाचे जमीनीचे खरेदीखत गहाणखत त्यासंबधी महसुली फेरफार कडई पत्रक सख्ये आजोबा त्यांच्या बहिणी यांचे जन्म व मृत्यु दाखले पुरावे दिल्याने समितीने यापूर्वीच गृह चौकशी करून मला जात वैधता प्रमाणपत्र दिले आहे. ९ सप्टेंबर २१ रोजी समितीने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो.
संजय क्षीरसागर
भाजप नेते मोहोळ

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here