श्री संत दामाजी साखर कारखान्याची ३३ वी आॅनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री संत दामाजी साखर कारखान्याची ३३ वी आॅनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

कारखाना साईटवर २०० के।एल।पी।डी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प उभारणार व्हाईस चेअरमन श्री.अंबादास कुलकर्णी

सोलापूर // प्रतिनिधी

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मा।आमदार श्री।
समाधानदादा आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली लवकरच ४५ के।एल।पी।डी ऐवजी २००
के।एल।पी।डी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प उभारणी करणार असलेचे मत कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा।श्री।अंबादास चिंतामणी कुलकर्णी यांनी कारखान्याच्या ३३व्या आॅनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन
बोलताना व्यक्त केले। श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची ३३ आॅनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि।२६ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ठिक ११।०० वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते।

सुरुवातीस श्री संत दामाजीपंत, श्री विठ्ठल, कारखान्याचे संस्थापक स्व।कि।रा। मर्दा उर्फ मारवाडी वकीलसाहेब, संस्थापक व्हाईस चेअरमन स्व।रतनचंद शहा शेठजी यांच्या प्रतिमेचे पूजन व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळाचे शुभहस्ते करणेत आले। कारखान्याचे संचालक श्री। सचिन शिवशरण यांनी अहवाल सालात मयत झालेल्या थोर व्यक्ती, संस्थेचे सभासद, कामगार तसेच कारखान्याचे चेअरमन मा।आमदार श्री। समाधानदादा आवताडे यांच्या आज्जी व जेष्ठ संचालक मा।श्री। बबनराव आवताडे यांच्या मातोश्री स्व।जनामाई बाबुराव आवताडे यांचे नुकतेच निधन झालेने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन सभेचे कामकाजास सुरुवात केली। कारखान्याचे संचालक श्री।अशोक केदार सर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत
करुन कारखाना कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली। कारखान्याचे व्हाईस चेअरमन सभेचे अध्यक्ष श्री।अंबादास कुलकर्णी हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कारखान्याचे कामकाज करीत असताना मागील पाच वर्षात ब-याच अडचणी आल्या परंतु कारखान्याचे सभासद, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, मजुर, कामगार, व्यापारी या सर्वांचे सहकार्याने अडचणीवर मात करत सर्व हंगाम पार पाडले। मागील सन २०२०-२१ गळीत हंगामात ३,७२,५१४ मे।टन ऊसाचे गाळप करुन  ३,४७,०००
क्वंटल साखर पोती उत्पादन झाले असुन ९।३२% साखर उतारा राहिला आहे। गतवर्षी जिल्हयातील अनेक कारखाने बंद असतानाही आपण अनेक अडचणीवर मात करुन
आपला कारखाना चालू केला। त्यामुळेच या कारखानदारीवर अवलंबून असणा-या अनेक
घटकांना उर्जीतावस्था मिळाली। तसेच कारखान्याची एफ।आर।पी। रु।२११९।०६ प्र।मे।टन प्रमाणे असुन एकही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना परिसरातील कारखान्यांचे तुलनेत दि ३१/१२/२०२० अखेर गळीतास आलेल्या ऊसाचे अॅडव्हान्स
बिल प्र।मे।टन रु।२०००/- प्रमाणे व दि।१/१/२०२१ ते दि।६/३/२०२१ म्हणजेच हंगामअखेर गळीतास आलेल्या ऊसास प्र।मे।टन रु।१५००/- प्रमाणे संबंधीत शेतक-यांनी मागणी केलेल्या त्यांचे बँक खात्यात जमा केलेले आहे। हंगामातील उर्वरित एफ आर पी लवकरच देण्याची व्यवस्था करित आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच येणा-या २०२१-२२ गळीत हंगामाकरिता गळीतास येणा-या ऊसाचे वाढीकरिता मुबलक पाऊस झालेला आहे। आपले तालुक्यासाठी वरदायीनी असणारे उजनी धरण भरले आहे। येणा-या हंगामाकरिता संचालक मंडळाने ६।०० लाख मे।टन ऊस गळीताचे उद्दीष्ठ ठेवले असून सभासद, शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, तोडणी यंत्रणा, ठेकेदार यांच्या सहकार्याने गाळपाचे हे उदिष्ठ निश्चीतच आपण गाठू शकू याविषयी मला खात्री आहे। तरी आपले तालुक्यात एकमेव सहकारी तत्वावर चालु असलेल्या आपल्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे गळीतास
आपला ऊस देवुन ऊस उत्पादक सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांनी गळीत हंगाम
यशस्वी करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन व्हाईस चेअरमन श्री। अंबादास कुलकर्णी यांनी केले। कार्यकारी संचालक श्री। झुंजार आसबे यांनी विषय पत्रिकेवरील व आयत्यावेळच्या विषयाचे वाचन केले। सर्व विषयांना सभासदांना खेळीमेळीच्या वातावरणात आॅनलाईन व्हीडीओ काॅन्फरन्सींगव्दारे टाळयांच्या गजरात मंजुरी दिली। तसेच सभासद श्री। कुरडे यांनी उपस्थित केलेल्या सुचना /प्रश्नांना उत्तरे दिली। व्हीडीओ काॅन्फरन्सवर कारखान्याचे सभासद श्री। अविनाश मोरे यांनी शेतक-यांची एफआरपी वेळेवर देणेची व्यवस्था रणेबाबत विनंती केली। तसेच सभासद श्री।सर्जेराव आवताडे यांनी सभासदांना १० रुपये प्रति किलो या दराने साखर देत असलेबाबत संचालक मंडळाचे अभिनंदन केले. 

तसेच श्री. चंद्रकांत उन्हाळे यांनी कारखान्यामार्फत ऊस बेणे पुरवठा करणेबाबत सुचना मांडली। यावर बोलताना कार्यकारी संचालक म्हणाले की, यावर्षी वसंतदादा शुगर इन्सि्टटयुट पुणे यांचेकडून बेणे मागविले असून त्याची कारखाना बेणेमळयात माहे आॅक्टोबर २०२१ मध्ये लागण करुन पुढील वर्षी शेतक-यांना ऊसबेणे देणेची व्यवस्था करणेत येईल। श्री।प्रकाश भिंगेयांनी दिपावली साखर बाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना कार्यकारी संचालक श्री। आसबे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव व संभाव्य गर्दी विचारात घेता दिपावली २०२१ करिता सभासदांना सवलतीच्या दराने देणेत येणारी साखर दि।२७/९/२०२१ पासून कारखाना साईटवर उचेठाण, बठाण, मुढवी, ब्रम्हपूरी व माचणूर येथील सभांसदांना तसेच मंगळवेढा येथील साखर विक्री केंद्रावरुन उर्वरीत सर्व गावात्ाील सभासदांना देणेची व्यवस्था करीत असलेचे सांगितले।
सदर प्रसंगी कारखान्याचे सभासद, संचालक सर्वश्री लक्ष्मण जगताप, राजेंद्र सुरवसे, राजीव बाबर, राजेंद्र पाटील, शिवयोग्याप्पा पुजारी, बापू काकेकर, बसवेश्वर पाटील, मारुती थोरबोले, रामकृष्ण चव्हाण, लक्ष्मण नरुटे, भुजंगराव आसबे, सुरेश भाकरे, बाळासाो शिंदे, महादेव लवटे, सचिन शिवशरण, अशोक केदार,संजय पवार, विजय माने संचालिका  सौ स्मिता म्हमाणे, सौ। कविता निकम यांचेसह श्री।प्रमोद म्हमाणे, श्री. भारत निकम, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख व कामगार बंधु आॅनलाईन तसेच प्रत्यक्ष उपस्थित होते. आॅनलाईन मोबाईलवर सर्व सभासदांना सभा पाहण्यासाठी लिंक देणेत आली होती। सभा पार पाडणेसाठी सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख यांनी परिश्रम घेतले. शेवटी कारखान्याचे संचालक श्री. बाळासाहेब शिंदे यांनी प्रत्यक्ष व आॅनलाईन उपस्थित सर्वांचे आभार मानून सभेचे अध्यक्षांचे परवानगीने सभा संपलेचे जाहीर केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here