”श्री संत दामाजी साखर कारखान्याचा वजनकाटा प्रमाणित असलेबाबत पुन्हा एकदा सिध्द”

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ चा गळीत हंगाम सध्या सुरु असून दि. ०९/०२/२०२२ रोजी सोलापूरचे श्री. अ. ध. गेटमे, उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र,सोलापूर जिल्हा व श्री. पी. एच. मगर, निरीक्षक,
वैधमापनशास्त्र सोलापूर-४ विभाग तसेच मा.श्री. किशोर रा धायफुलेसाहेब, लेखापरीक्षक श्रेणी १ सहकारी संस्था (साखर) सोलापूरचे यांचे भरारी पथकाने सायंकाळी ६.०० वाजता अचानक कारखाना कार्यस्थळावर येवून कारखान्याच्या ऊसवजन काटयाची पाहणी करुन कारखान्याचा ऊस वजन काटा तंतोतंत बरोबर असलेबाबत लेखी प्रमाणपत्र कारखान्यास दिले. सदरवेळी श्री. विनायक भिवा कोकरे, रा ब्रम्हपूरी, व श्री. गुंडु दगडू घोडके, रा. बठाण या शेतक-यांसमक्ष ऊसाने भरुन आलेली वजन करुन गव्हाणीजवळ गेलेली वाहने परत बोलावून घेऊन वजन करुन त्याचे वजन बरोबर असलेची खात्री करुन घेणेत आली. कारखान्याचे चेअरमन मा.आ. श्री समाधानदादा आवताडे व संचालक मंडळाचे उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनाखाली चालु गळीत हंगामामध्ये कारखान्याने दि.०९/०२/२०२२ अखेर ८८ दिवसात २७५४९५ मे. टन ऊसाचे गळीत करुन सरासरी १०% उता-याने २७४९३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे। श्री संत दामाजी कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरु असून चालु गळीत हंगामामध्ये ठरविलेले गाळपाचे उद्दीष्ठ निश्चितच पार केले जाईल अशी माहिती प्र. कार्यकारी संचालक श्री।रमेश गणेशकर यांनी दिली. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा ऊस वजन काटा तंतोतंत बरोबर असलेबाबत भरारी पथकाने पाहणी करुन दिलेल्या अहवालामुळे कारखाना ऊस उत्पादक सभासद तसेच शेतकरी यांचेमध्ये कारखान्याबद्दल असलेला विश्वास पुन्हा एकदा सिध्द झाला आहे.

यावेळी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर श्री.गणपत घाडगे, चिफ केमिस्ट श्री.मोहन पवार, मुख्य शेती अधिकारी श्री।रमेश पवार, कार्यालय अधिक्षक श्री. दगडू फटे, केनयार्ड सुपरवायझर श्री.प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी श्री.लक्ष्मण बेदरे, असि. इंजिनिअर श्री.गजानन चौगुले तसेच ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुक कंत्राटदार उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here