श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि।, मंगळवेढा,ता।मंगळवेढा,जि।सोलापूर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

दि।२४/१२/२०२१ मानसिक आजार ओळखुन तज्ञ डाॅ क्टरांचे सल्ल्याने उपचार घ्यावेत ः- डाॅ हर्षल थडसरे
 

मानसिक आजार ओळखुन तज्ञ डाॅ क्टरांचे सल्ल्याने उपचार घेतल्याने आजार बरे होतात असे मत डाॅक्टर हर्षल थडसरे यांनी व्यक्त केले। जिल्हा मानसीक आरोग्य जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकीत्सीक कार्यालय, सोलापूर व ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत दामाजी सह।सा।का।लि।, मंगळवेढा येथील अधिकारी, कर्मचारी वर्ग यांचेकरीता मानसीक आरोग्य जनजागृतीसाठी कार्यशाळेत डाॅ।हर्षल थडसरे बोलत होते। सदरचा कार्यक्रम आपले कारखान्याचे चेअरमन व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा।श्री।समाधानदादा आवताडे यांचे प्रयत्नातून कारखाना साईटवर घेण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक श्री।राजेंद्र सुरवसे हे होते। सर्वसाधारण मानसिक आजाराची लक्षणे इतर आजारप्रमाणे दिसत नाहीत परंतु त्याच्या चालण्याबोलण्यातुन जानवु लागल्यास त्यांना देवदेवता, भोंदु बाबा म यांचेकडे उपचारासाठी घेवुन जातात।  त्यामुळे त्यांचा मानसिक आजार बरा न होता वाढत जातो। मेंदुतील रसायनामध्ये बदल झाल्यामुळे अशा व्यक्तींना वेगवेगळे भास निर्माण होवुन अशा व्यक्तींची संशयी वृत्ती निर्माण होते। असा पेशंट मानसोपचार तज्ञांकडे उपचाराकरिता वेळेत गेल्यास आजार पुर्णपणे बरा होतो। वेडसरपणाचा आजार बरेचसे नातेवाईक व रुग्न लपवुन ठेवतात। मानसिक आजार लहान व्यक्तीपासुन वृध्द्ापर्यंत सर्वांनाच होतात। आजार ओळुखन वेळेवर उपचार न घेतल्यास रुग्णास, कुटुंंबास व पर्यायाने समाजास सुध्द्ा त्रास होतो। यासाठी कुटुंबियानी मानसोपचार तज्ञांकडे  सल्ला घेवुन उपचार करणे गरजेचे आहे। कोणतेही व्यसन हे मानसिक आजाराचे लक्षण आहे। गतवर्षी कोविडमध्येही सुरक्षा बाळगुनसुध्दा् मला माझ्या कुटुंंबाला आजार होईल काय अशी मानसिक भिती वाटुन बेचैेनीसारखा आजार निमार्ण होतो। व्यवस्थित भुक लागत नसेल, सतत चिडचिड होत असेल, कामात मन लागत नसेल अशा व्यक्तींना उदासिनता या नावाचा आजार निर्माण होतो। ही सर्व मानसिक त्रासाची लक्षणे आहेत असे म डाॅ।हर्षल थडसरे यांनी व्यक्त केले। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ। कुंदन कांबळे म्हणाले कि, मानसिक आजाराला इतर आजाराप्रमाणे पाहु नका त्यावर दुर्लक्ष करु नका। लक्षणे वाटल्यास मानसोपचार तज्ञांकडे उपचार घ्यावेत। व्यक्तीचे सर्व रिपोर्ट नाॅर्मल असतील तर तनाव आहे काय, उदासिनता आहे काय, याचे मुळ कारण शोधुन मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे। तनावाचा परिणाम होवुन मधुमेह,रक्तदाब, झोपेच्या तक्रारी, लैंगीक समस्या निर्माण होतात। यासाठी शरीर व मन याचा समतोल साधुन यापुढे चालावे लागेल। वेडेपणाचे पेशंट ९०टक्के बरे होतात पण त्यासाठी  वेळेत मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। एखाद्या व्य्क्तीला झालेल्या शारिरिक आजारामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना त्रास होत नाही परंतु मानसिक आजारामुळे सर्व कुटुंबीयाना यातना भोगाव्या लागतात। या कार्यक्रमासाठी  कारखान्याचे संचालक मा।सुरेश भाकरे, मा।सचिन शिवशरण,मा।भुजंगराव आसबे, यांचेसह श्री।भारत निकम, प्र।कार्यकारी संचालक श्री।रमेश गणेशकर, जनजागृती कार्यशाळा,वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय,मंगळवेढा चे डॉ पद्माकर अहिरे व आयुष वैद्यकिय अधिकारी डाॅ.निखील जोशी श्री शिवशरण उपस्थित होते। तसेच कारखान्याचे शेती अधिकारी-रमेश पवार,सिव्हील इंजिनिअर-प्रविण मोरे,स्टोअरकिपर-उत्तम भुसे, टाईम किपर-आप्पासाो शिनगारे, सुरक्षा अधिकारी-लक्ष्मण बेदरे,बैलगाडी भरती प्रमुख जगन्नाथ इंगळे यांचेसह कारखान्याचे सर्व विभागाचे कर्मचारी, परिसरातील सभासद शेतकरी,ऊसतोडणी
मजुर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यालयीन अधिक्षक श्री दगडु फटे यांनी केले तर श्री तानाजी सावंजी यानी उपस्थितांचे आभार मानले।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here