श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचा वार्षिक अहवाल सभासदांना द्यावा : अभिजीत पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

६ गटामध्ये आणि कारखानास्थळावर स्क्रीन लावून सभासदांची सभेची सोय करावी

पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर गुरसाळे येथील श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा दि . ३० मार्च २०२२ रोजी असून त्याअगोदर सभासदांना वार्षिक अहवाल देण्यात यावा असे अभिजीत पाटील यांनी कारखाना प्रशासनाशी पत्र व्यवहार केला. तसेच येणारी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी गटवार स्क्रीन लावून सभासदांची सोय करण्यात यावी तसेच कार्यस्थळावर शेतकरी सभासदांसाठी सोय करून द्यावी असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

   त्या निवेदनात म्हटले आहे की,  श्री विठ्ठल सह . साखर कारखान्याची वार्षिक सर्व सभा दि.३0 मार्च २०२२ रोजी असून सर्व शेतकरी सभासदांनकडे ईमेल अॅड्रेस व स्मार्ट फोन

नसल्यामुळे कारखाना कार्यस्थळावर जिल्हाधिकारी यांच्या सुचने नुसार मैदानच्या ५० टक्के क्षमतेनुसार त्याठिकाणी एल,ई.डी स्किन, साऊंड सिस्टीम, मंडप, बोलण्यासाठी माईक, व चहा पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी . 

    गेली ३ वर्ष वार्षिक सर्व साधारण सभा झाली नसून अगामी निवडणूकी मध्ये ३ वर्ष ऊस घातला नाही किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसेल तर सदस्यत्व व मतदानाच्या किंवा निवडणूकीस उभारण्यावर आक्षेप येऊ शकतो . आम्हाला सभासदांना तिथे वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळनी ऑनलाईन पध्दतीने घ्यावी व घेत असतील तर त्यांनी आम्ही कुठुनही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दयावी व संचालक मंडळाने आम्हास बोलण्यासाठी त्याठीकाणी आमचे प्रश्न मांडण्याची व सर्व सभासदांना हजर राहण्याची तिथे सोयी सुविधा उपलब्ध करून दयाव्या.

      तसेच जी गावे सभासद संख्येने मोठी आहेत अशा गटवार ६गटात ६ ठिकाणी एल.ई.डी स्किन
बसवून त्याठिकाणी सभासदांची सोय करण्यात यावी . आम्ही सर्व सभासद दि . ३० मार्च २०२२ रोजी मैदानाच्या ५० टक्के क्षमेतेने त्याठिकाणी उपस्थित राहणार आहोत . त्याप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहील असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here