श्री विठ्ठल कारखान्यावर चेअरमन अभिजीत पाटील यांच्या अभिनंदनाचा केला ठराव!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री विठ्ठल कारखान्यावर चेअरमन अभिजीत पाटील यांच्या अभिनंदनाचा केला ठराव!

श्री विठ्ठल सह. सा. का. लि. वेणूनगरचे मागील दोन वर्षापासून थकीत असलेले ऊस बिलाची रक्कम रुपये 30 कोटी बुडतात की, काय असे कारखान्याचे ऊस उत्पादक सभासदांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. परंतु कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री अभिजीत (आबा) पाटील यांचेवर विश्वास दाखवून बंद पडलेला साखर कारखाना श्री अभिजीत (आबा) शिवाय इतर कोणासही चालू होणार नाही, याची सभासदांनी मनात खात्री बाळगून श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे नेतृत्वाखाली श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे पॅनल मधील सर्व उमेदवारांना निवडून दिले. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान श्री अभिजीत (आबा) पाटील यांनी निवडणुकीच्या प्रत्येक सभेमध्ये मागील थकीत ऊस बिलाची पेमेंट दिल्याशिवाय कारखान्याची सन 2022-23 गळीत हंगामाची मोळी टाकणार नाही, असे अभिवचन दिले होते.

त्या पवित्र वचनामध्ये अधिक सुधारणा करून सन 2022-23 च्या बॉयलर प्रतिपादन पूर्वीच ऊसबिल देऊन सभासदांचा दहीदिशास विश्वास संपादन केला आहे. त्याबद्दल रविवार दिनांक 11/09/2022 रोजीच्या मा. संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये श्री अभिजीत (आबा) पाटील यांचा अभिनंदनचा ठराव पारित केला.

त्यास कारखान्याची संचालक श्री समाधान वसंतराव काळे यांनी सूचना मांडली व त्या संचालक श्री दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी अनुमोदन दिले.

यावेळी कारखान्याची सर्व संचालक, प्र. कार्यकारी संचालक, अधिकारी वर्ग, सभासद व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here