श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी बँकेचा विविध मान्यवरांच्या उपस्थित शुभारंभ संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी बँकेचा विविध मान्यवरांच्या उपस्थित शुभारंभ संपन्न!

पंढरपूर येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी बँकेचा शुभारंभ सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे शुभ हस्ते व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे अध्यक्षतेखाली व धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा प्रा . शिवाजीराव काळुंगे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मा . चेअरमन भगीरथ भालके चेअरमन अभिजीत पाटील सु . रा .परिचारक पतसंस्था चेअरमन प्रकाश पाटील या मान्यवरांच्या उपस्थिती मार्केट यार्ड पंढरपूर येथे संपन्न झाला .

यावेळी प्रशांतराव परिचारक यांनी बोलताना नागेश फाटे हे तालुक्यातील उद्यमशील नेतृत्व असून त्यांची मानसिकताच उद्योग व्यवसायाची आहे निधी बँकेच्या माध्यमातून समाजाला आर्थिक मदत ते करतील आज ह्या संस्थेची सुरुवात लहान स्वरूपात झाली असेल तर सर्वांच्या सहकार्याने ही संस्था मोठी होईल व लहान शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना यातून मदत फाटे करतील अशी अपेक्षा बाळगून शुभेच्छा दिल्या . कल्याणराव काळे यांनी बोलताना नागेश दादांना जी जबाबदारी दिली त्या संधीच सोन करण्याचं काम ते करतात हे मी काम जवळून अनुभवल आहे त्यांचे आजपर्यंतचे काम खूपच पारदर्शक आहे . कर्जदारांनी देखील ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतले त्याच व्यवसायात तो पैसा लावून आपली पत निर्माण करावी असे सांगितले .

यावेळी शिवाजीराव काळुंगे सर हे आपल्या भाषणातून नागेश फाटे हे समाजात हजारो माणसे कष्टकरी व्यापारी विश्वासू आहेत त्यांच्याकडे स्थावर नाही अशा लोकांना आपण आर्थिक सहकार्य करून समाजात स्थान निर्माण करून द्यावे व त्यांच्या जीवनात थोडसं सुख देऊन आर्थिक उन्नती साधण्याचं काम करावे व त्यांचे अश्रू आपण पुसण्याचे काम करावे असे अपेक्षा काळुंगे सरांनी व्यक्त केली . मी एका वेटरला चार कोटी रुपये दिले त्याच्यावर विश्वास टाकला आज ते दोन भाऊ रोजचा दीड लाखाचा टर्नवर करून रोजची ५० हजाराची बचत ते करीत आहेत असेच काम गरजूंच्या गरजा ओळखून नागेश पाटील करतील त्यांच्या संस्थेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य आपण करू असे आश्वासन दिले .
यावेळी प्रकाश तात्या पाटील भगीरथ भालके अभिजीत पाटील यांनी या बँकेत सहकार्य करू असे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या .

संस्थेचे चेअरमन नागेश फाटे यांनी मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरताना तरुणांची व्यथा जाणली आहे त्यामुळे आपण निधी बँक ही संस्था आज शुभारंभ करत असून छोट्या मोठ्या उद्योगांना आपण आर्थिक पाठबळ देऊन त्यांना सहकार्य करू असे आश्वासन दिले .

यावेळी मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य सुरज रोंगे, विठ्ठल चे संचालक समाधान काळे , शिरोमणी व्हाईस चेअरमन राजेंद्र , सी . एस . सेक्रेटरी प्रदीप रासनकर, पंढरपूर नगरपालिका विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे , महादेव देठे, प्रकाश शेवाळे , राहुल जोशी संतोष बाबर , तेजस गांधी, भास्कर कसगावडे ,गणेश सूर्यवंशी , उद्धव बागल , बजरंग बागल , सुधीर भोसले , संदीप गाजरे , शहाजी साळुंखे ,विष्णू यलमार , हनुमंत तरटे , अनिकेत देशपांडे , राजश्री ताड ,अनिता पवार, शुभांगी जाधव ,नितीन शेळके सह बँकेचे सर्व संचालक व विविध गावचे ग्रामस्थ उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here