श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे पांडुरंग ऊस भुषण पुरस्कार जाहीर!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे पांडुरंग ऊस भुषण पुरस्कार जाहीर!

श्रध्देय मा.आ.कै.सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांच्या संकल्पनेतून व कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना दरवर्षी कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक साखर उताऱ्याचा व अधिक ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद शेतकऱ्यास ”पांडुरंग ऊस भुषण पुरस्कार” व ”पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार” हे पुरस्कार लागवड हंगाम 2017-18 पासून सुरु केलेले आहेत.

कारखाना कार्यक्षेत्रातील आडसाली हंगामातील ऊसाचे क्षेत्र कमी करणे पुर्व हंगाम व सुरु हंगामामध्ये ऊस क्षेत्र वाढविणे हे उद्दीष्ट ठेवून हे पुरस्कार सुरु करण्यात आलेले आहेत. संपुर्ण कारखाना कार्यक्षेत्रातून एक शेतकऱ्याची ”पांडुरंग ऊस भुषण पुरस्कार” साठी निवड करणेत येते. या पुरस्काराचे स्वरुप रक्कम रु.51000/- सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व फेटा असे असून हा पुरस्कार पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यास सहपत्निक देणेत येतो. तसेच कारखाना कार्यक्षेत्रामध्ये एकुण 7 गट आहेत. या प्रत्येक गटातून एक ”पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार” असे एकुण 7 पुरस्कार देणेत येतात. यामध्ये पुरस्कारप्राप्त प्रत्येक शेतकऱ्यास रक्कम रु.11000/- सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व फेटा असे आहे. या पुरस्कारामध्ये विजेत्या शेतकऱ्यास सपत्निक गौरविण्यात येते.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा शेतकरी कारखान्याचा सभासद असणे आवश्यक आहे. कारखान्याने ठरवून दिलेल्या को-86032, कोसी-671, vsi-08005 या ऊस जातींचीच ऊस लागण करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील शेतकऱ्यांनी ऊसाची लागण केल्यापासून ऊस तोडणीपर्यंत 100 गुणांची तपासणी विविध मुद्यांचे आधारे करणेत येऊन हे पुरस्कार देण्यात आले आहेत. पुढे ते म्हणाले ऊस लागण करतेवेळी पुर्व मशागतीपासून माती परिक्षण,चांगल्या बेणेमळ्यातील बेणेचा वापर,हिरवळीची खते,शेणखताचे स्लरीचा वापर,ठिबक सिंचन,जिवाणु खतांचा वापर,विविध द्रवरुप खतांच्या फवारण्या या सर्व बाबींचे मुल्यमापन करणे करीता स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमनुक करणेत आली होती. या सर्व शेतकऱ्यांचा स्वतंत्रपणे आलेला खर्च याच्या तपशीलवार नोंदी वर्षभर ठेवण्यात आलेल्या होत्या.यामधुन सर्वात कमी खर्च व अधिक रिकव्हरीचा, अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यास हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत.

यावर्षी गळीत हंगाम-2021-22 साठी वरिल पुरस्कारांचेकरिता एकुण 30 शेतकऱ्यांची नाव नोंदणी झालेली होती. यामधून खालीलप्रमाणे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची निवड करणेत आलेली आहे.

” पांडुरंग ऊस भुषण पुरस्कार ” विजेते शेतकरी
गळीत हंगाम -2021-22
सभासदाचे नांव गांव गटाचे नांव एकरी उत्पादन खर्च एकरी उत्पन्न
1 श्री महेश शंकर व्यवहारे करकंब करकंब 27500 108.397

” पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार” विजेते शेतकरी

गळीत हंगाम -2021-22
सभासदाचे नांव गांव गटाचे नांव एकरी उत्पादन खर्च एकरी उत्पन्न.

1 श्री सचिन बाळासो रोंगे खर्डी पंढरपूर 24950 80.626

2 श्री मधुकर भिमराव मस्के ना.चिंचोली देगांव 26070 98.290

3 श्री बंडु सिध्दनाथ शिंदे अनवली चळे 31820 56.282

4 श्री राजाराम विष्णु पवार मेंढापूर भोसे 32100 50.709

5 श्री रमेश दत्तू खारे करकंब करकंब 38133 54.536

ही नाविन्यपुर्ण स्पर्धा सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा.प्रशांत परिचारक मालक यांचे व कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास शंकरराव खुळे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धांचे मुल्यमापन करणेत आले. स्पर्धेतील शेतकऱ्यांना मा.कार्यकारी संचालक डॉ.श्री.यशवंत कुलकर्णी सो, केन मॅनेजर श्री.संतोष कुमठेकर सो, व ऊस विकास अधिकारी श्री.सोमनाथ भालेकर सो, यांनी ऊस पीक घेत असताना विविध स्तरावरती मार्गदर्शन केले होते.
सदर पुरस्काराचे वितरण कारखान्याचे दि.29/09/2022 रोजी होणाऱ्या वार्षीक सर्वसाधारण सभेमध्ये स.11.00 वाजता कारखाना कार्यस्थळावरती कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री प्रशांत परिचारक यांचे शुभहस्ते व कारखान्याचे संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये वितरीत करणेत येणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here