श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 च्या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते व व्हा.चेअरमन मा.श्री. कैलास खुळे, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन मा. आ. श्री . प्रशांतराव परिचारक यांनी सांगीतले की ,श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या गळीत हंगामासाठी सुमारे 14 लाख मे.टनाच्या ऊस नोंदी असुन या सर्व ऊसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने कारखान्याने तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार केले असुन त्यांना लवकरच ऍ़डव्हांन्स हप्त्याचे वाटप करणार आहोत. कारखान्याच्या मागील गळीत हंगामात जास्तीचा ऊस असल्याने हंगाम जास्त दिवस चालुन उच्चांकी गाळप करुन उच्चांकी साखर पोती उत्पादित केलेली आहेत. येणाऱ्या गळीत हंगामात ही जास्तीचे गाळप करण्याचा कारखाना व्यवस्थापणाचा मानस आहे.कारखान्याचे संस्थापक चेअरमन व पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा श्रध्देय सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांनी घालुन दिलेल्या आदर्शानुसार कारखान्याची वाटचाल सुरु आहे.
यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगीतले की, कारखान्याने गत हंगामातील ऊसाची बिले, तो़डणी वाहतुक यंत्रणेची बिले वेळेवर दिली असुन कामगारांंचे पगार, बक्षीस ही वेळेवर देत असुन कारखान्याकडे कोणत्याही प्रकारची बँकांची कर्जे थकीत नाहीत. कारखान्याची आर्थिक परिस्थिती सदृढ असुन येणारा गळीत हंगाम हा कारखान्याच्या दृष्टीने रेकॉर्ड ब्रेक गळीत हंगाम राहणार आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. दिनकरराव मोरे, श्री.वसंतराव देशमुख, श्री.उमेशराव परिचारक, श्री.दिलीप चव्हाण, श्री.हरीष गायकवाड, श्री. ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री. बाळासो यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.सुदाम मोरे, श्री.विजय जाधव, श्री.हणमंत कदम, श्री.किसन सरवदे, श्री. शामराव साळुंखे, श्री.राणु पाटील व अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here