श्री पांडुरंग कारखान्यामार्फत पंढरपूर आरोग्य विभागास सिरींजची मदत!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सामाजिक बांधिलकी जपणे हे आमचे कर्तव्य:आ.प्रशांतराव परिचारक

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि,श्रीपूर यांच्याकडून आरोग्य विभाग पंढरपूर यांना पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या कोविड लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या 25000 सिरीज आरोग्य विभाग पंढरपूर यांना कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते मोफत देण्यात आल्या यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, व संचालक आणी आरोग्य विभागातील डॉक्टर उपस्थित होते.

यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की पंढरपूर तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात कोविशिल्ड व कोवॅक्शिन लस उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी डिस्पोजल सिरींज आरोग्य विभागाकडे शिल्लक नसल्याने लसीकरण करण्यासाठी अडचण येत होती. सदरची अडचण दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने कारखान्यामार्फत 25000 सिरीजची मागणी केली होती. त्यानुसार आम्ही त्वरीत निर्णय घेवून कारखान्याच्या माध्यमातून पंढरपूर आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.एकनाथ बोधले यांचेकडे सिरींज देण्यात आल्या त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील लसीकरणाला वेग येणार असून लसीकरणापासून वंचित राहणाऱ्या जनतेला लस देता येणार आहे. अशाप्रकारे सामाजिक कार्य करुन आम्ही नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आहोत.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की पंढरपूर आरोग्य विभाग पंढरपूर यांच्या सिरींजच्या मागणीनुसार कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक व संचालक यांनी त्वरीत निर्णय घेवून 25000 सिरींज आरोग्य विभागास देवून समाज उपयोगी कार्यास मदत करून स्वर्गिय मोठे मालकांचा वारसा पुढे चालवला आहे. तसेच आरोग्य विभागात कोविड लसीकरणाबाबत कारखान्यामार्फत सर्वतोपरी मदत करुन कारखान्याकडे असणाऱ्या सर्व तोडणी ,वाहतुक मजूर, कामगार यांचे लसीकरण करुन घेतले आहे त्यामुळे कोविड 19 च्या धोक्यापासून कारखान्याचे मजूर, कामगार यांना होणारा धोका कमी झाला आहे.
पंढरपूरचे आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी पांडुरंग कारखान्यामार्फत आ.प्रशांतराव परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व संचालक यांनी सिरींज उपलब्ध करुन दिल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील जनतेचे कावीड-19 चे लसीकरणाचे काम जोरात सुरु होणार असल्याने त्यांचे आभार मानले.

यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.रेपाळ , डॉ.माळी आणि श्रीपूर, महाळुंगचे आरोग्य अधिकारी, डॉक्टर श्री भारत गायकवाड तसेच कारखान्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पोफळे , डॉ. प्रमोद पवार व अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here