श्री पांडुरंग कारखान्याचा वजनकाटा तंतोतंत असल्याचा वैधमापन तपासणी पथकाचा अहवाल.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार वैद्यमापन विभाग भरारी पथकाने श्री पांडुरंग कारखान्याच्या एकूण चारही काटयाची आज दि 13/01/2022 रोजी अचानकपणे तपासणी केली असता वैद्यमापन विभागाने पूर्वी केलेले सील जसेच्या तसे शाबूत असलेचा अहवाल वैद्यमापन समितीने दिला आहे. यावेळी भरारी पथकातील सदस्य व कारखान्याचे अधिकारी आदि उपस्थित होते.
वैद्यमापन भरारी पथकाने वजनकाटा तपासणी करुन वजन काटा तंतोतंत असल्याचा व त्यामध्ये कोणताही फेरफार नसलेचा अहवाल दिला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावर असलेला विश्वास आणखीनच दृढ झाला आहे.
वैद्यमापन पथकाने सुरुवातीस कारखान्याकडील असणाऱ्या चारही काटयाची तपासणी करत एकच वाहन चारही काटयावर फिरवून वजन केले असता त्यामध्ये कोणताही फरक आढळून आला नाही. त्यानंतर काटयावर 20 किलोची प्रमाणित वजने ठेवून प्रत्यक्ष वजन केले असता त्यामध्येही वजनात कोणताही फरक आढळून आला नाही.

श्री पांडुरंगवर गेल्या 29 वर्षापासून ऊस उत्पादकांनी दाखविलेली विश्वासाहर्ता आजही काटा तपासणीने पुन्हा एकदा सिध्द केली आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासलेमुळे ऊस उत्पादक शेतकरी नेहमीच कारखान्यास ऊस देण्यास प्राधान्य देतात तसेच श्री पांडुरंग कारखान्याने सोलापूर जिल्हयामध्ये सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना म्हणून नाव लौकीक मिळविला आहे. वैद्यमापन पथकामध्ये अकलूज विभागाचे निरीक्षक श्री.अंकुश यशवंत इंगोले, लेखापरिक्षक श्रेणी-1, सहकारी संस्था (साखर) सोलापूर चे श्री.पी.आर.शिंदे, पुरवठा निरीक्षक श्री.एस.डी.केमकर तसेच शेतकरी श्री भारत सोमनाथ महाडीक, आजोती, श्री रामचंद्र गोरख गोफणे, जैनवाडी कारखान्याचे संघणक प्रमुख श्री तानाजी भोसले, केनयार्ड सुपरवायझर राहुल साठे आणि वहान चालक, मालक इ. उपस्थित होते.

 

चौकट-

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालक यांचे आदर्शानुसार चालत असून कारखान्याचे चेअरमन आ.मा.श्री प्रशांतराव परिचारक यांचे नेतृत्वाखाली कारखाना शेतकऱ्यांचे हित जोपासत आहे. या हंगामातील उच्चांकी साखर उतारा, उच्चंाकी साखर उत्पादन, शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवून अनेक विक्रम प्रस्तापित करीत आहे. मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशानुसार आज वैद्यमापन विभागाच्या भरारी पथकाकडून आलेल्या वजन काटा तपासणीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावरील वजन काटयाबाबत असणारा विश्वास आणखी वाढला आहे.

डॉ.यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here