श्री दत्त जयंती चे औचित्य साधून सवलतीच्या दरात साखर वाटपाचा कार्यक्रम पै. श्री कृष्णा भाऊ वाघ युवा मंच यांच्या वतीने स्तुत्य उपक्रम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री दत्तात्रेय जन्माचे म्हणजेच दत्त जयंतीचे औचित्य औचित्य साधून फुलचिंचोली येथील नवतरूण जोशाचे युवक पैलवान श्री कृष्णा भाऊ युवा मंच यांच्या वतीने सर्व फुलचिंचोली व आसपासच्या गावांमध्ये 25 रुपये किलो सवलतीच्या दराने साखर वाटपाचा कार्यक्रम आज संपन्न झाला फुल चिंचोली येथील श्री भैरवनाथ मंदिरासमोर हा कार्यक्रम घेण्यात आला.
आज हा कार्यक्रम फुलचिंचोली गावासाठी घेण्यात आला असून उद्यापासून तालुक्यातील इतर गावामध्ये हा कार्यक्रम घेणार असल्याचे पै. कृष्णा भाऊ वाघ युवा मंचच्या वतीने सांगण्यात आले.
रुपये 25 एवढ्या नाममात्र दरामध्ये प्रत्येकी एका कुटुंबासाठी 50 किलोग्रॅम इतकी साखर वाटप होणार आहे.
एवढ्या स्वस्त दरात व नाममात्र दरामध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम पंढरपूर तालुक्यात पहिल्यांदाच होत असून या अशा उपक्रमाच्या माध्यमातून पैलवानकीच्या क्षेत्रात नाव गाजवलेले पैलवान कृष्णा भाऊ वाघ यांनी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांचे तालुक्यातील सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here