शेतकऱ्यांचे हत्याकांड करणारे, मोदी आणि योगीच्या रूपाने जनरल डायरचे वंशज सत्तेवर आहेत :- प्रकाश वाले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शेतकऱ्यांचे हत्याकांड करणारे, मोदी आणि योगीच्या रूपाने जनरल डायरचे वंशज सत्तेवर आहेत :- प्रकाश वाले

उत्तरप्रदेश मधील शेतकरी हत्याकांड व काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापूर शहर कॉंग्रेस वतीने निदर्शने करून निषेध करण्यात आला.

 

 

उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने केलेल्या शेतकरी हत्याकांड नंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या मा. प्रियांका गांधी यांना अटक केल्याच्या व शेतकरी हत्याकांडाचा निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी कॉंग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले
यावेळी योगी मोदी सरकार मुर्दाबाद, किसान विरोधी नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी यांना अटक करणाऱ्या योगी सरकारचा निषेध असो, शेतकरी हत्याकांड करणाऱ्या योगी सरकारचा निषेध असो असे जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, गेल्या एक वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर व देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत काल उत्तरप्रदेशातील लखीमपुर येथे शांततापूर्ण आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने गाडी घातली आणि ८ शेतकऱ्यांची हत्या केली. भारताच्या ७५ व्या अमृत महोस्तवी वर्षात पुन्हा एकदा मोदी आणि योगीच्या “जनरल डायरचे वंशज” सत्तेवर आहेत असे वाटत आहे या घटनेने इंग्रजी राजवटीची आठवण करून देत आहे. मोदी आणि योगी भाजप सरकारचा शेतकरी विरोधी अमानवीय, खुनी चेहरा समोर आला आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या पिढीत शेतकरी कुटुंबियांना भेटायला गेले असता तेथे पोलीली बळाचा वापर करून योगी सरकारने हरगाव येथे अटक केली असे करून शेतकरी आणि विरोधकांचा आवाज दाबून टाकत आहेत. आणि शेतकरी हत्याकांड करून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न मोदी, योगी, भाजपा सरकार करत आहे. गप्प रहा नाहीतर चिरडून टाकू असा संदेश मोदी, योगी, भाजपा सरकार देत आहे. त्यांचा हा विनाशकाली विपरित बुध्दी असून मोदी, योगी, भाजपचा अहंकार आणि मस्ती शेतकरी व जनता लवकरच चिरडून टाकेल. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखव करून ताबडतोब अटक करावी. कृषी कायदे मागे घेईपर्यत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभा आहे.

या आंदोलनात शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक हाजी तौफीकभाई हत्तुरे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, उत्तर समन्वयक सुनील रसाळे, तिरुपती परकीपंडला, अंबादास गुत्तीकोंडा, अशोक कलशेट्टी, राजन कामत, नागनाथ कदम, सुमन जाधव, संध्याताई काळे, सोहेल शेख, भोजराज पवार, कमरूनिस्सा बागवान, प्रमिला तुपलवंडे,सायमन गट्टू, मन्सूर गांधी, नागनाथ कोप्पा, सतीश संगा, लतीफ शेख, अरुणाताई वर्मा, अंजलीताई मंगोडेकर, परशुराम सतारेवाले, सॅमसन दिनकर, निलेश व्हटकर, रवींद्र शिंदे, हरीश गायकवाड, दत्तात्रय नामकर, प्रशांत सोनवणे, राकेश मंथेन, धीरज खंदारे, आश्विन जाधव, राजन निकाळजे, साहिल मस्के, शिल्पा चांदणे, शोभाताई बोबे, मिलिंद सुरवसे, रुपेश मोटे, मुस्कान शेख, रफिक शेख, मुमताज तांबोळी, चंदाताई काळे, मीना गायकवाड, रेणुका दिनकर, अनिता भालेराव, बसंती साळुंखे, मुनिराबी शेख, नीता बनसोडे, वैशाली गौड, कल्पना वैनूर, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here