शेगाव येथे कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात पालखी सोहळ्याचा समारोप प्रगट दिन महोत्सवानिमित्त गजानन विजय ग्रंथ पारायण व श्रीमद् भागवत कथा आरंभ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शेगाव येथे कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात पालखी सोहळ्याचा समारोप

प्रगट दिन महोत्सवानिमित्त गजानन विजय ग्रंथ पारायण व श्रीमद् भागवत कथा आरंभ

अकोट – संत नगरी श्री क्षेत्र वरुर जऊळका योग योगेश्वर संस्थान ते संत नगरी श्री क्षेत्र शेगाव येथे पायदळ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या दिंडी सोहळ्या मध्ये अकोला व अमरावती जिल्ह्यातील किमान तीनशे वारकर्‍यांनी सहभाग दर्शविला व गण गण गणात बोते या गजरा मध्ये पालखी सोहळा आनंदात उत्साहात दिनांक 15 फेब्रुवारीला संत नगरी शेगाव येथे दाखल झाला.
शेगाव येथे बागातील देवी मंदिरामध्ये श्री तुकाराम भाऊ बडे यांच्यातर्फे वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली व ह-भ-प श्री गणेश महाराज शेटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी शेगाव नगरातील अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी पालखी सोहळा ला भेटी दिल्या व शेगाव नगराला दिंडीची प्रदक्षिणा करून कृष्णाजी पाटलाच्या मळ्यामध्ये जिथे समर्थ सद्गुरु गजानन महाराज जळत्या पलंगावर बसले व ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश केला त्या ठिकाणी पालखी सोहळ्याचा श्रींची महाआरती करुन समारोप करण्यात आला कृष्णाजी पाटलांच्या मळा मध्ये जुणे श्रींचे मंदिर होते त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून हे मंदिर शेगाव मध्ये येणाऱ्या भाविकांच्या करिता आतिशय रमणीय ठिकाण बनलेले दिसून येत आहे व नंतर गजानन महाराज संस्थान येथील दर्शनाची इ पास काढलेली होती व श्रींच्या दर्शनाचा लाभ घेण्यात आला या पालखी सोहळ्यामध्ये डोंगरगाव ,काटी पाटी, ईसापुर, मुंडगाव, तांदुळवाडी, वरुर जऊळका पंचक्रोशी येथील भक्तगण मंडळी मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेली होती.
योग योगेश्वर संस्थांमध्ये आजपासून प्रगट दिन महोत्सवाला सुरुवात झाली असून दिनांक 16 -2-2022 ते 23-2-2022 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी पाच वाजता काकडा भजन, दहा ते बारा वाजेपर्यंत श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री सात ते दहा वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे पारायण व्यासपीठ नेतृत्व ह-भ-प श्री रामदास महाराज जवंजाळ ,श्रीमद् भागवत कथा वाचक ह-भ-प श्री गणेश महाराज शेटे कथेला साथ संगत गायनाचार्य विक्रम महाराज शेटे ,सोपान महाराज ऊकर्डे, तबलावादक विलास महाराज कराड, झाकी मास्टर रामेश्वर महाराज गाडे, ऑर्गन वादक प्रदीप महाराज गायकवाड ,विणेकरी श्रीकृष्ण महाराज बाबुळकर ,साऊंड ऑपरेटर गजानन मोडक व पंचक्रोशीतील दिग्गज गायक वादक मंडळींची उपस्थिती लाभणार आहे वरील सर्व कार्यक्रम श्री रतन पाटील वानखडे यांच्या मार्गदर्शनात पार पडेल अशी माहिती योग योगेश्वर संस्थान अध्यक्ष तथा विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष श्री गणेश महाराज शेटे यांच्या वतीने देण्यात आले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here