शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एस.पी. स्कूलचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांचे वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नांदोरे ता.पंढरपूर येथील पायल फाऊंडेशन संचलित एस.पी. स्कूल मधील चार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली .
यामध्ये इयत्ता पाचवी मधून जयश्री दिगंबर पाटील हिने 248 गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण मधून तालुक्यात 3 रा, जयराजे गोपाळ भोसले याने 236 गुण मिळवून तालुक्यात 6 वा, किशोर सुरेश पिसे त्याने 218 गुण मिळवून तालुक्यात 8 वा तसेच इयत्ता आठवी मधून अमरजा हनुमंत ननवरे हिने 160 गुण मिळवून तालुक्यामध्ये ग्रामीण सर्वसाधारण मधून 6 वा क्रमांक पटकावला, त्याबद्दल प्रशालेच्या वतीने सर्व विद्यार्थी व पालक यांचा सन्मान करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक आ. बबनराव शिंदे, डॉ. एन. बी.होनराव, पंढरपूर पं.समितीचे गट शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे ,संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे ,सचिव अश्वराज वाघ ,खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, तज्ञ संचालक युवराज सातुरे यांनी केले यावेळी दिगंबर पाटील ,हनुमंत ननवरे, नंदकुमार काटकर ,शिवजीत व्यवहारे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष शाळा बंद असतानासुद्धा प्रशालेच्या वतीने दर्जेदार ऑनलाइन शिक्षण प्रणाली वापरून विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करून घेण्यात आली व विद्यार्थ्यांनी यश मिळवले त्याबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना शहाजी साठे , जीवन वाहेकर ,नानासाहेब निकम, साईनाथ कुंभार, स्वाती चव्हाण, विद्या पाटील, सोमनाथ ढावरे, कादर मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here