शिवसेनेकडून सुस्ते पंचायत समिती गणासाठी मा.विलास चव्हाण इच्छुक!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातून शिवसेनेकडून सुस्ते पंचायत समिती गणासाठी मा.विलास चव्हाण शिवसेना तालुकाउपप्रमुख हे प्रमुख दावेदार म्हणून इच्छुक उमेदवार आहेत.

या सुस्ते व आसपासच्या गावांमध्ये विलास चव्हाण यांचे सर्वांबरोबर जिव्हाळ्याचे व निकरांचे संबंध असून, त्यांनी आपल्या सामाजिक कामातून सर्व समाज घटकांना वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपत मदत केली आहे. त्याचबरोबर विलास चव्हाण यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने पंढरपूर तालुक्यात असून पंढरपूर तालुक्यातील सुस्ते पंचायत समिती गण हा सर्वसाधारण पुरुष असा असून या गणामध्ये विलास चव्हाण हे प्रभाव दावेदार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या सर्वच वरिष्ठ नेते मंडळींची त्यांचे अत्यंत कौटुंबिक नाते असून विलास चव्हाण हे सर्वच समाज घटकातील व सर्वच पक्षातील सर्वच नेतेमंडळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत मनमोकळेपणाने काम करीत राहिले आहेत. विलास चव्हाण यांचे *”फक्त आणि फक्त काम बोलते”* आज पर्यंत पंढरपूर तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रम पंढरपूर ते कुरूल रस्त्यासाठी करण्यात आलेले आंदोलन त्याचबरोबर शिवसेनेच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळांची असलेले त्यांचे संबंध या मुद्द्यावर त्यांना पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गणातून शिवसेनेकडून, उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता असून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यासाठी संपूर्णपणे तयारी केलेली असल्याचे सुद्धा समजत आहे.
सुस्ते, गणातून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक मातब्बर नेते मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलेले आहेत. पण शिवसेनेकडून प्रबळ दावेदार म्हणून विलास चव्हाण यांचे नाव समाज माध्यमातून समोर येत असल्यामुळे त्यांची उमेदवारी शंभर टक्के निश्चित असल्याचे पंढरपूर तालुक्यातील राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here