शिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद

सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले . त्यास महिला विडी कामगारांनी प्रचंड प्रतिसाद दिला . अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिली .
शिवसेना पक्षप्रमुख मा . उध्दवजी ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान राबविण्याचे केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दक्षिण सोलापुर कुंभारी येथील माँ साहेब घरकुल वसाहतीत शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना सदस्य नोंदणी बैठकीचे आयोजन करण्यात आले .
पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विष्णु कारमपुरी ( महाराज ) , श्रीनिवास चिलवेरी , दशरथ नंदाल , विठ्ठल कु -हाडकर , शिवा ढोकळे , रेखा आडकी यांची प्रमुख उपस्थिती होती . सदर बैठकीत बोलताना पुरुषोत्तम बरडे म्हणाले की , महाराष्ट्रातील काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शिवसेना विरुध्द लढलेल्या विरोधी पक्षांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची निवड केली . म्हणजे उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व किती महान आहे हे दिसुन येतो . आपण उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक म्हणुन काम करतांना आपल्याला अभिमान वाटतो . म्हणुन शिवसेनेचे सभासद फार्म भरून शिवसेना सदस्य व्हा आणि शिवसेना सदस्य झालेल्या सर्व विडी कामगार बंधु – भगिनींचे स्वागत करून आणि शुभेच्छा दिल्या . त्या आगोदर महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी बैठकीचे प्रास्तावना केले . तर आभार प्रदर्शन महिला सदस्या रेखा आडकी यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीनिवास चिलवेरी यांनी केले .
सदर बैठकीस कांचन कस्तुरी , सुनंदा चेंडके , प्रमिला गडगी , कृष्णाबाई मादगुंडी , जमुना बोल्लु , उमाबाई ईरापोल , यादम्मा जल्ला , अंबिका तिरंदास , नागमणी सोमा , जगदेवी माळी , जयश्री गडगी , पुजा वंगा , पद्मा अच्युगटला , अंबुबाई कोंडा , रेखा आडकी , संध्याराणी कुल्हाडकर , गुरुनाथ कोळी , पप्पु शेख , गणेश म्हंता , श्रीनिवास बोगा , नरेश अन्नलदास , प्रशांत जक्का यांच्यासह विडी कामगार बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here