शासकिय धान्य गोदामातील कामगारांचा कडकडीत बंद जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे; पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे व माथाडी बोर्डाचे सचिव अशोक कांबळे यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलनास स्थगिती

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे थकित पगारी बाबत आज सोलापूर जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदाम बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे व माथाडी बोर्डाचे सचिव अशोक कांबळे यांनी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांना थकित बिलाविषयी अश्‍वासन दिल्यानंतर तात्पुरते हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सांगितले.  
एप्रिल 2020 पासून कोरोना कालावधीमध्ये अतिआवश्यक सेवाम्हणून शासकिय धान्य गोदामातील कामगारांनी आहोरात्र काम केले. पंतप्रधान मोफत धान्य व रेग्युलर धान्य वाटप असे दोन प्रकारचे वाटप शासकीय धान्य गोदामातून केले जात होते. परंतु गेल्या अनेक महिन्यांसापून शासकिय धान्य गोदामातील कामगारांचे पगार थकित होते. त्या संदर्भात 21 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांच्या दालनात बैठक होवून संबंधीत ठेकेदार व जिल्हा पुरवठा ऑफिसने वेळेत बिले आदा करण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी प्रधानसचिव महाराष्ट्र शासन व वित्त सल्लागार सचिव मंत्रालय यांच्याकडे याबाबतचे मार्गदर्शन मागण्यात आले. परंतु त्याच्यावर अद्यापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने व कामगारांचे पगार थकित राहिल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजिवी कामगार समन्वय समितीच्यावतीने दि. 20 ऑक्टोंबर रोजी मा.जिल्हाधिकारी, मा. जिल्हा पुरवठा अधिकारी, तसेच सहाय्यक कामगार आयुक्त, पोलिस आयुक्त सोलापूर, पोलिस अधिक्षक ग्रामिण यांना शासकिय धान्य गोदामातील थकीत पगार बिले 27 ऑक्टोंबर पर्यंत आदा करण्यात यावीत अन्यथा 27 ऑक्टोंबर पर्यंत न केल्यास सोलापूर जिल्हा शासकिय धान्य गोदामातील कामगार काम बंद करतील असे निवेदन जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांची दिले. परंतु 27 ऑक्टोंबर पर्यंत सर्व कामगारांनी अधिकार्‍यांच्या निवेदनाची अथवा विचार विनिमयाची वाट पाहिली परंतु सर्व अधिकार्‍यांनी कामगार्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. म्हणून दि. 27 ऑक्टोंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, माळशिरस, अकलुज, अक्कलकोट, टेंभुर्णी, माढा, बार्शी, वैराग, मोहोळ आदी ठिकाणी कामबंद आंदोलन करण्यात आले. कामबंद आंदोलन केल्यानंतर जिल्हा पुरवठा कार्यालयातील अधिकार्‍यांनी पगारा विषयी चर्चा न करता तुम्ही कामे करा नहीतर तुम्हाला कामावरून काढण्यात येईल अशी दमदाटी करण्यास सुरूवात केली. जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी जिल्हा  पुरवठा अधिकारी लांडगे मॅडम यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून थकित बिलांविषयी चर्चा केली. व सप्टेंबर अखेर पर्यंची बिले दिवाळी सणा आगोदर आदा करण्याचे आश्‍वासन जिल्हा पुरवठा अधिकारी लांडगे यांनी दिल्यानंतर स्वत: आपण लक्ष घालून कामगारांची बिले आदा लवकरात लवकर करू असे अश्‍वासन जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी व जिल्हा माथाडी बोर्डाचे सचिव अशोक कांबळे यांनी दिल्यानंतर  तृर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे बेमुदत आंदोलन थांबविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी थकित बिलाविषयी लवकरात लवकर चर्चा करून कष्ट करणार्‍या कामगारांना त्यांना त्यांच्या कष्टाचा दाम लवकरात लवकर त्यांच्या पदरात पाडून 

द्यावा असे आव्हान जिल्हाक्ष शिवाजी शिंदे यांनी दिले. या आंदोलनात जिल्ह्यातील शासकिय गोदामातील कामगार सहभागी झाले होते. 
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here