शालेय वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास मुदतवाढ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर, दि.12:शालेय वाहनांच्या कागदपत्राचा परवाना, योग्यता प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती, वाहन नोंदणी इत्यादीला 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.

राज्यात 4 ऑक्टोबर 2021 पासून शाळा सुरू झाल्या असून स्कूल बसेसद्वारे शालेय विद्यार्थी वाहतूकही सुरू झालेली आहे. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण प्रलंबित असलेल्या वाहनांचे नियोजन करुन आवश्यकतेनुसार सुट्टीच्या दिवशीही नूतनीकरण करण्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. रस्ता सुरक्षा, विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण केल्याशिवाय कोणतेही वाहन रस्त्यावर आणू नये.

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसची वेळेत तपासणी होण्यासाठी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज सकाळी 7.00 वाजता सुरु करण्यात येणार असून ते कामकाज दोन सत्रात सुरू राहणार आहे. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरु राहणार असून शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत कामकाज पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here