शहीद इन्स्पेक्टर निवृत्ती जाधव यांना विनम्र अभिवादन (श्रीपूर मध्ये शहीद निवृत्ती जाधव स्मारकावरती साजरा केला 11 वा स्मृतिदिन)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शहीद इन्स्पेक्टर निवृत्ती जाधव यांना विनम्र अभिवादन

(श्रीपूर मध्ये शहीद निवृत्ती जाधव स्मारकावरती साजरा केला 11 वा स्मृतिदिन)

श्रीपूर ता.माळशिरस येथील शहीद इंस्पेक्टर निवृत्ती जाधव 10 ऑक्टोबर 2010
रोजी गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यांना वीरमरण
आले. त्यांच्या वीरपत्नीने बांधलेल्या श्रीपूर येथील शहीद निवृत्ती जाधव
स्मारकावरती त्यांचा अकरावा स्मृतिदिन त्यांना पुष्पहार, श्रद्धांजली
अर्पण करून, अभिवादन करून साजरा करण्यात आला,

यावेळी श्री चंद्रशेखर विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम माने, माजी
मुख्याध्यापक विनायक जोशी, सहसचिव महादेव नाकुरे, सुरक्षा अधिकारी भागवत
पारसे, प्राथमिक विभागाच्या शिंदेमॅडम, शहिद निवृत्ती जाधव
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व वीरपत्नी सुरेखा निवृत्‍ती जाधव,
प्रतिष्ठानच्या सचिव सारिका नाईकनवरे, प्रेरणा जाधव, धर्मेश जाधव, अकलूज
पोलिस स्टेशनचे पोलीसनाईक संजय चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल निशांत सावजी,
अंकुश साळुंखे, सुनील पताळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल रेडे,
अण्णा जाधव, सिताराम गुरव, राहुल देशमुख, प्रदीप कोल्हे, नरसिंह साळुंखे,
अनिकेत यादव, सुजय मांडवे, विनोद कडलास्कर, समाधान जगताप, वर्धमान फडे,
आदित्य जाधव, तोकिर शिकलकर, कृष्णा माने, ऋषिकेश शेटे, युवराज मोहिते,
श्रीकेश बुद्धिबळ, श्री चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक, माध्यमिक व
नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाचा सर्व शिक्षक स्टाफ, परिसरातील
ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शहीद निवृत्ती जाधव यांना
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तानाईकनवरे यांनी केले .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here