व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या युवकांचा सार्थ अभिमान – कल्याण काळे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या युवकांचा सार्थ अभिमान – कल्याण काळे

व्यावसायिक शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता गाव खेड्यातील युवकांनी स्वतःचा व्यवसाय उभारून आपल्याबरोबर इतरांना रोजगार दिला आहे त्यांचासार्थ अभिमान वाटतो असे प्रतिपादन वसंतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी केले.
ते वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभ प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसाय उभारावा त्यासाठी निशिगंधा बँकेच्या वतीने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करून कौशल्यपूर्ण व्यवसाय उभा करणे काळाची गरज आहे.

या कार्यक्रमासाठी वसंतदादा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे ,अर्जुन जाधव, सुरेश देठे रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या प्राचार्या गीतांजली खाडे, ह.भ.प.धनंजय गुरव पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थीं तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या प्रशिक्षणार्थीने यशस्वी उद्योग व व्यवसाय उभा केल्याबद्दल यशस्वी उद्योजक प्रवीण दांडगे परमेश्वर मोरे व ज्ञानेश्वर कचरे या माझी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सुधाकर कवडे बाळासाहेब काळे गीतांजली खाडे पालक दिनकर दांडगे यांची समायोजित भाषणे झाली.
प्रास्ताविक प्राचार्य संतोष गुळवे यांनी केले तर सूत्रसंचालन निदेशक अनिल ननवरे यांनी व उपस्थितांनचे आभार निदेशक अरुण शिंदे यांनी मानले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here