विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानकडून विविध मान्यवरांचा पुरस्काराने गौरव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधत पंढरपुरात विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानकडून विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे,डीव्हीपी समूहाचे चेअरमन अभिजित पाटील,प्रा.डॉ.बी.पी.रोंगे,युवा नेते प्रणव परिचारक,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,भैय्या देशमुख,ऍड.राजेश भादुले आदी उपस्थित होते.
या पुरस्कार प्रदान सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या ४० मान्यवरांच्या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.तर कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या ४० जणांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.तर कोरोना काळात जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडलेल्या ४० आशा स्वयंसेविकांचा कोरोना योद्धा पुरस्कार देत साडी वाटप करून गौरव करण्यात आला.तर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचाही विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेल्या पंढरपुरातील दीपक नाईकनवरे (क्रिकेट अंपायर),कु.आस्था माने (एसएससी बोर्डात राज्यात प्रथम),कैवल्य उत्पात(बॉक्सिंग),विशाल सूरवसे (बॉडी बिल्डींग),कु.प्रतीक्षा चौधरी(किक बॉक्सिंग),प्रतीक चौधरी(मार्शल आर्ट),कु.तेजस्विनी नामदे(आंतरराष्ट्रीय कराटे फायटर),कु.चैताली बुरांडे (राज्य बॉक्सिंग कास्य पदक),कविता नेहतराव (वाकिंग).तर यावेळी पत्रकार संघाच्या सर्व नूतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक डी.राज सर्वगोड यांनी दिली.
या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे प्रास्ताविक निषा फुले यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.सविता भातलवंडे यांनी केले.हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी जयंती समिती अध्यक्ष सुरेश नवले,अनिल ननवरे सर,नितीन काळे,अण्णा धोत्रे,आदम बागवान,रमेश सासवडकर,आकाश फडतरे,प्रा.सुदाम गायकवाड,विलास जगधने सर,आनंद थोरात,रामदास सर्वगोड,सौ.राजश्री सर्वगोड,आशाताई बागल,लक्ष्मी सर्वगोड,श्वेता ननवरे,वंदना कसबे,रेहाना आतार,राबिया शेख,प्रकाश अभंगराव,बंडूराजे भोसले,पद्माकर सर्वगोड,आबा मोरे,संजय मोरे,मीराताई सरवदे,शर्मिला तोंडसे,विना वाघमारे,निलेश जाधव,जमीर तांबोळी,रुपेश वाघमारे,जुनेद बागवान,नागेश कांबळे,सूरज जैस्वाल,मेजर बंगाळे,अक्षय कसबे,सागर वाघमारे,आनंद कुलकर्णी विनोद धुमाळ,परमेश्वर सुडके,संदीप फडतरे,तानाजी मोरे,गजानन शिंदे,समीर मोघे,अभिषेक सर्वगोड,संतोष बंडगर,प्रतीक सर्वगोड,सचिन नेहतराव,सागर वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here