विरोधकांच्या राजकारणाचा बसतोय ‘भिमा’च्या सभासदांना फटका

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विरोधकांच्या राजकारणाचा बसतोय ‘भिमा’च्या सभासदांना फटका

सभासदत्व रद्द होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

 

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या हजारो सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा डाव सध्या विरोधकांनी आखला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भीमा पट्ट्यातील जे शेतकरी भीमा कारखान्याचे सभासद आहेत ज्यांनी अनेक वेळा भिमाच्या निवडणुकांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे अशा शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्याची खेळी विरोधकांकडून आखली जात असून त्यांच्या या राजकारणाचा फटका सभासदांना बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे अस्वस्थता पसरली आहेच शिवाय याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

भीमा सहकारी साखर कारखान्यावर सध्या माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक यांचे एक हाती वर्चस्व आहे. कारखान्याची सत्ता आल्यापासून त्यांनी कारखान्यावर अमुलाग्र बदल केले आहेत. यामध्ये कारखान्याचे गाळप क्षमता विस्तारीकरण, 25 मेगावॅट को-जन असे प्रकल्प नव्याने उभे केले आहेत. निसर्गाच्या वेगवेगळ्या अडचणीमुळे आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे सध्या देशासह महाराष्ट्रातील साखर कारखानदारी अडचणीत आहे हे वास्तव नाकारता येत नाही. अर्थात या निसर्गाच्या अडचणीचा व शासनाच्या उदासिनतेचा फटका टाकळी सिकंदर येथील भीमा कारखान्याला बसला आहे. मात्र निवडणुकांमध्ये आपल्याला यश येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द केले तर त्याचा आपल्याला अधिक फायदा होईल या कपट हेतूने सध्या विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणला जातोय. 

याबाबत वृत्त असे की, भीमा सहकारी साखर कारखान्याचे स्थापनेवेळी अनेक ऊस उत्पादक शेतकरी हे कारखान्याचे संस्थापक सभासद आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून कारखान्याच्या गळीत हंगामाला ऊस घातला आहे. अनेक निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजाविला आहे. अशा अनेक सभासदांनी अडचणींमुळे मुळ गावहुन शेती विकुन दुसऱ्या गावी घेतली आहे. किंवा ती शेती मुलांच्या नावे केली आहे अशा सभासदांवर शेती क्षेत्र नाही हे कारण पुढे करत भीमाचे माजी संचालक शिवाजी चव्हाण यांनी ५ मार्च रोजी १ हजार ७८ सभासदांच्या सभासदात्वर प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे  हरकत घेऊन त्यांच्या सभासदत्वावर गंडांतर आणले याविरोधात ‘भीमा’च्या संचालक मंडळाने सहकारमंत्र्याकडे अपिल केले. हे प्रकरण ताजेच असताना लोकनेते चे माजी व्हाईस चेअरमन सतिश भोसले पापरीकर यांनी पुन्हा एकदा प्रादेशिक सहसंचालकांकडे याचिका दाखल करुन ६८५ शेतकऱ्यांना नोटीस धाडल्या आहेत. विशेष म्हणजे भीमा कारखान्याचा सभासदांच्या यादीत नावाचा उल्लेख नसताना म्हणजे भीमा कारखाना व शेतकरी यांच्यामध्ये कोणताच संबंध नाही अशा अनेक देखील शेतकऱ्यांना प्रादेशिक सहसंचालकांकडुन विरोधकांनी हरकत घेतल्याने नोटीस आल्या असुन केवळ सभासदांचा रद्द केलेला आकडा फुगीर करण्यासाठी विरोधकांकडुन उठाठेव सुरु आहे. 

एकुणच विरोधकांच्या या खेळीमुळे भीमा च्या अनेक सभासदांवर गंडांतर आले आहे किंवा येवु पाहत आहे. अर्थात यामुळे सभासद शेतकरी हवालदिल झाला असुन याबाबत हरकत घेणाऱ्यांना याबाबत फोन करुन जाब विचारत आहे. 

चौकट 

सभासदत्व कायम करण्यासाठी आमचे प्रयत्न

– विरोधकांनी राज्यातील सत्तेचा गैरवापर करत जे शेतकरी भीमा कारखान्याचे संस्थापक सभासद होते अशा सभासदांवर राजकीय आकसापोटी जाणून बुजून गंडांतर आणले आहे किंवा तसा अजूनही त्यांचा प्रयत्न सुरू आहे मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही यासाठी न्यायालयीन लढाई लढून सभासदांचे सभासदत्व कायम करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे मात्र विरोधकांनी राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेला खेळ थांबवावा. गेली दहा वर्षे आम्ही सत्तेत असताना एकाही विरोधक सभासदावर हरकत आणावी, सभासदत्व रद्द करावे असा सुडबुद्धीचा विचार सभासदांबाबत केला नाही.

– सतीश जगताप, व्हाईस चेअरमन भीमा शुगर

 

चौकट

त्यावेळी हरकत का घेतली नाही ?

–  भिमाच्या कार्यक्षेत्रात आमची शेती असतानादेखील राजकीय आकसापोटी आपण आमच्यावर हरकत घेऊन आमचे सभासदत्व रद्द करण्याचा जाणून बुजून प्रयत्न करत आहात. मात्र ज्यावेळी मोहोळ तालुक्यातील लोकनेते शुगर ‘सहकारी’ असताना सतिश भोसले पापरीकर कारखान्याच्या ‘व्हाईस चेअरमन’ पदाची जबाबदारी सांभाळत असताना तो खाजगी करून हजारो शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द केले. त्यावेळी भोसले यांनी हरकत घेतली नाही. त्यांचा स्वाभिमानी बाणा आम्हाला दिसून आला नाही.

युवराज शिंदे, ऊस उत्पादक सभासद शेतकरी

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here