विरोधकांचा कारखाना बंद पाडायचा डाव!, महाडिक साहेबांना खंबीर साथ देणार!!:प्रा.राजकुमार पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विरोधकांचा कारखाना बंद पाडायचा डाव!,
महाडिक साहेबांना खंबीर साथ देणार!!:प्रा.राजकुमार पाटील

सरकारी ईच्छाशक्ती व योग्य धोरणाचा अभाव तसेच विविध संकटामुळं साखर कारखाने अडचणीत आले मात्र त्याचे खापर जर एकट्या भिमाचे चेअरमन धनंजय महाडिक यांच्या डोक्यावर फोडणार असाल तर भीमाचा सुजाण सभासद राजा कधीच सहन करणार नाही. हा 22 हजार सभासदांच्या कुटुंबाच्या चुलीशी निगडित प्रश्न आहे.आम्ही आमच्या वडिलांच्या रूपाने संस्था स्थापनेपासून सभासद आहोत पण स्वर्गीय भिमरावदादांच्या नंतर व20-25 वर्षे कारखाना स्थळावर जाता आले नाही. गावच्या, तालुक्याच्या सुडाच्या राजकारणातून आमचा ऊस अक्षरश: जाळावा लागला.कोन्हेरीतून गुरसाळेच्या विठ्ठल कारखान्याला ऊस पाठवावा लागला. गेली 20 वर्षे सामान्य सभासदांची कोंडी होत होती. स्वर्गीय भिमराव दादा महाडिक यांनी चाळीस वर्षापूर्वी टाकळीच्या ओसाड माळरानावर शेतकऱ्यांचा राजवाडा उभा केला व पन्नास-साठ गावचा आर्थिक दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्याचे अनमोल काम केले.स्वर्गीय भीमराव दादा महाडिक यांच्याच चिरंजीवाने म्हणजे सध्याचे विद्यमान चेअरमन धनंजय (मुन्ना साहेब) महाडिक यांनी विरोधकांकडून सत्ता खेचून आणली आणि आमच्यासारख्या सभासदांना खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं.न्याय मिळाला. चेअरमन च्या खुर्चीला खुर्ची लावून सामान्य सभासद बसू लागला. कारखाना आपलासा वाटू लागला. विरोधकांच्या काळातील जुन्या फालतू प्रथा बंद केल्या,खर्चाला आळा घातला,गेस्ट हाऊस वरील उधळपट्टी बंद केली.संचालकांचे डिझेल बंद केले. प्रत्येक संचालकाला दिलेली जीप गाडी बंद केली.बेमाप ऍडव्हान्स ऊचलणे बंद केले. कारखान्याचे कामगार संचालकाच्या शेतावर व घरी वापरणं बंद केलं. अशा अनेक सभासद बंधूंना स्वागताहार्य वाटतील अनेक चांगल्या गोष्टी खा. मुन्नासाहेब महाडिक यांनी केल्या. सुरुवातीची 2 च वर्ष चांगला गळीत हंगाम झाला आणि काळाची गरज ओळखून कारखाना विस्तारीकरण को-जन सारखा क्रांतिकारी निर्णय सभासदांच्या इच्छेखातर घेण्यात आला.पण दुष्काळामुळे नंतर चा एकही हंगाम चांगला झाला नाही.परिणामी अपेक्षित असे गाळप झाले नाही.निसर्ग राजा कोपला, राजाने छळले,नवऱ्याने मारले,पावसाने झोडपले, कोरोना महामारी आली,बाजारपेठेत मंदि आली तर दाद न्यावी कोणाकडे या म्हणीप्रमाणे निसर्ग आणि सरकारची अनास्था व कारखानदारी विषयी चुकिची धोरणे खाजगी साखर कारखान्यांची वाढलेली संख्या यामुळे सर्व मनसुबे कोसळले आणि देशातील अनेक कारखान्याप्रमाणे भीमा सुद्धा दुर्दैवाने अडचणीत आल्यामुळे कामगाराचे थकीत वेतन व ऊस बीलाचा प्रश्न निर्माण झाला.साखर कारखानदारी मध्ये कामगार आणि सभासद ही दोन केंद्रबिंदू आहेत. आणि या दोन रथांच्या चक्रानांच अग्नी परीक्षेतून जावं लागलं.हिटलरच्या म्हणण्याप्रमाणे सैन्य पोटावर चालते तसंच कामगारांनाही वेतन नाही मिळाले तर कारखानदारी अधोगतीकडे जाण्यास विलंब लागत नाही, तरीपण दुर्दम्य इच्छाशक्ती व वडिलांनी उभ्या केलेल्या भीमा कारखान्या बद्दल मनात खरी तळमळ व आस्था असणाऱ्या चेअरमन साहेबांनी आणि संचालक मंडळाने थकीत वेतनाचा प्रश्न जवळ जवळ सोडवत आणला आहे. मात्र विरोधक कामगारांना बळीचा बकरा बनवू पाहत आहेत. चालू कामगार आपल्या हाताला लागत नाहीत हे लक्षात घेऊन निवृत्त कामगारांना उपोषणाला बसवण्याचे कट कारस्थान रचले जात आहे. सत्तापिपासू विरोधकांचा हा डाव निवृत्त कामगार सुद्धा यशस्वी होऊ देणार नाहीत हे निर्विवाद सत्य आहे. हा जटिल प्रश्न केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मदतीने लवकरच सुटेल. हा आशावाद व विश्वास सर्व कामगार वर्ग व सभासद बंधूंना आहे. सर्व सभासद,कामगार व गावोगावच्या कार्यकर्त्यांना महाडिक यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असून सर्वजण एकजुटीने काम करणार आहोत. विरोधकांच्या म्हणण्यानुसार भीमा कारखाना जर डबघाईला आणला आहे, कर्जाच्या खाईत लोटला आहे, भिमाचा भोगावती झाला आहे तर मग सत्ता मिळवण्यासाठी एवढा विरोधकांचा अट्टाहास का? नक्की कशासाठी?
हे सभासदांना न कळण्याइतका भिमाचा सभासद बाळबोध नाही हे लक्षात ठेवा.
भीमा परिवाराचे संघटक व समन्वयक प्रा.संग्रामदादा चव्हाण गेलं वर्ष झालं वर्तमानपत्रातून,सोशल मीडियाच्या माध्यमातून खरी आणि वास्तव परस्थिती बाबत अभ्यासपूर्ण भूमिका मांडत आहेत. त्यांची भूमिका म्हणजे संपूर्ण भीमा परिवाराची भूमिका आहे हे विरोधकांनी कदापि विसरू नये. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नसतात! हे विरोधकांनी लक्षात ठेवावे .भिमाच्या आगामी निवडणुकीमध्ये भीमा चे चेअरमन माननीय खासदार धनंजय (मुन्नासाहेब) महाडिक यांच्यामागे कोन्हेरी,पापरी,येवती, पोखरापूर, खंडाळी या परिसरातून सभासदांची प्रचंड ताकद उभी करणार आहोत असे प्रतिपादन प्रा. राजकुमार पाटील सर यांनी कोन्हेरी येथे आमचे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. यावेळी कोन्हेरीचे लक्ष्मण गुंड,देविदास माने,बप्पा माळी,राजू जरग व इतर भिमाचे सभासद बंधू उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here