विद्येच्या माहेरघरात बोगस पीएचडी पदव्यांचा सुळसुळट! 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्प्राऊट्स Exclusive पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळेला विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या माधुरी सतीश मिसाळ यांच्या पूजा या कन्या. या कन्येने कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ( टोंगा ) मधून बोगस ऑनररी पीएचडी घेतलेली आहे. या विद्यापीठातून नियमबाह्य पद्धतीने ऑनररी पीएचडी पदव्या विकल्या जातात, म्हणून पुण्यात वानवडी पोलीस स्टेशनमध्ये ‘एफआयआर’ देखील झालेला आहे, तोही महाराष्ट्राच्या उच्चशिक्षण विभागाकडून. तरीही हा गोरखधंदा खुलेआम चालू आहे.

पुणे हे तर विद्येचे माहेरघर, मात्र या पुण्यनगरीतही बोगस पीएचडी विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. आजवर या बोगस विद्यापीठांवर अनेक वेळेला तक्रारी करण्यात आल्या, अगदी एफआयआर सुद्धा झाले, चार्जशिटही देण्यात आली, काही वेळेला तर प्रकरण न्यायालयातही गेले. मात्र हा धंदा बिनबोभाट चालू आहे.

अशा प्रकारची फेक ऑनररी पीएचडी विकत घेण्याची किंमत ही ५ हजारांपासून १ लाख रुपयांपर्यंत घेण्यात येते व हा कथित पदवीदान सोहळा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात येतो. वास्तविक हा कार्यक्रम घेणेही अवैध असते. मात्र या कार्यक्रमात सेलेब्रिटी मंडळी व राजकीय पुढारी यांनाही जाणीवपूर्वक आमंत्रित करण्यात येते. त्यामुळे पोलिसांना माहित असूनही ते कारवाई करायला धजावत नाहत.

फेक ऑनररी पीएचडीचे रजिस्ट्रेशन हे प्रामुख्याने विद्यापीठाच्या वेबसाइटवरून केले जाते. या वेबसाईटचा लूकही पाश्चात्य पद्धतीने बनवला जातो. या भुलभुलैयाला माणूस भुलतो व बोगस पीएचडी खरेदी करतो. आतापर्यंत या गोरखधंद्यात अनेकांना पोलिसांनी पकडले आहे. मात्र तुरुंगातून जामिनावर सुटून आल्यावर ते पुन्हा याच काळ्या धंद्यात प्रगती करतात. यापैकी

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here