विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीचे अभिजीत पाटील यांनी फुंकले रणशिंग

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(उंबरगाव येथील सभासदांनी जाहीर पाठिंबा देत अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केला)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

तुंगत येथे काल दि.२१एप्रिल २०२२ श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत विचार विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकऱ्यांचा राजवाडा अशी ओळख असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची गेल्या तीन चार वर्षात दयनीय अवस्था झाली आहे.
विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने केलेल्या गलथान कारभारांमुळे शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची बिले कारखान्याकडे थकीत असून कामगारांचे पगारही अद्याप मिळालेले नाहीत. त्यातच विठ्ठलच्या निवडणूकीचे बिगुल सध्या वाजले असून वातावरण तापत असून विचार विनिमय बैठकीत हजारोच्या संख्येने उपस्थिती दाखवत सभासदांनी एक प्रकारे पाठिंबा दर्शविदा आहे.

ठळक मुद्दे

-सभासदांनी विश्वास दाखविल्यास थकीत ऊस बील, कामगार पगार देऊनच पुढील गळीत हंगामाची मोळी टाकणार
-शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बील आणि कामगारांना पगार देणार
-कारखान्यातील एक रूपयाही घरी घेऊन जाणार नाही
-कारखान्याचा भत्ता, गाडी, डिझेलही वापरणार नाही.

यावेळी पुढे बोलताना अभिजीत पाटील म्हणाले उस्मानाबाद, नाशिक, नांदेड व सांगोला ४पडलेले परजिल्ह्यातील साखर कारखाने चालवून त्यांना ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम केले आहे. परंतू मी ज्या कारखान्याचा फाऊंडेशन सभासद आहे तो कारखाना आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा अशी ओळख असणारा विठ्ठल कारखाना गेल्या दोन वर्षांपासून संचालक मंडळाचे चुकीचे धोरणामुळे बंद स्थितीत आहे. शेतकऱ्यांसह या ठिकाणच्या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांची होणारी हेडसांळ लक्षात घेऊन आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून शेतकऱ्यांनी विश्वास दाखवून माझ्यावर जबाबदारी सोपविल्यास कारखान्याची मोळी टाकण्याअगोदर सर्व शेतकऱ्यांची थकीत बिले, वाहतूकदारांची तोडणी बिले, कर्मचाऱ्यांचे पगार देऊनच मोळी टाकणार सांगितले.

आज बाहेरील देशात साखर विक्री करून लवकर शेतकऱ्यांना बील देण्याचे धोरण, इथेनॉल, सीएनजी, बायोगॅस, या उप पदार्थातून अधिक नफा घेत शेतकऱ्यांना ज्यादा दर देण्याची भूमिका असेल. सांगोला कारखान्यांच्या मोळी पूजनावेळी शेतकर्‍यांनी ऊस कोठेही वजन करून आणण्याची ग्वाही दिली होती. तशीच ग्वाही आज विठ्ठलच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देत असल्याचे त्यांनी सांगितले.

गत दोन वर्षांपासून विठ्ठल बंद स्थितीत असल्याने पंढरपुरच्या बाजारपेठेवरही याचा परिणाम झाला असून कारखान्याचे सभासदांना कर्मवीर औदुंबर अण्णा यांचे कार्यकाळात मान सन्मान प्रतिष्ठा होती ती आता राहिलेली नाही हाच मान सन्मान पुन्हा आणण्यासाठी सभासदांनी माझ्यावर विश्वास दाखवून जबाबदारी सोपवली तर मी कारखान्याची गाडीच काय डिझेल, भत्ताही घेणार नाही आणि एक रुपया घरी नेणार नाही अशी शपथच त्यांनी उपस्थित सभासदा समोर घेतली.

यावेळी तुंगत गटातील शेतकरी सभासदांच्या वतीने अभिजीत पाटील यांचा सत्कार मंगेश रणदिवे, मा.सरपंच अमित सांळूखे, उपसरपंच पंकज लामकाने व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विष्णु भाऊ बागल,चंद्रभागा साखर कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण, दत्ता नाना नागणे, मोहन भाऊ तळेकर, मारुती भाऊ कोरके, तुंगतचे माजी सरपंच राजाभाऊ रणदिवे, माजी उपसरपंच विठ्ठल नाना रणदिवे, समाधान कदम, दत्तात्रय रणदिवे, अरूण आण्णा रणदिवे, प्रकाश रणदिवे सर, काशीद साहेब,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मा. कायदेशीर सल्लागार श्री.विश्वंभर चव्हाण , ढेरे सर,राज्य प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष शेळके सर,सेवानिवृत्त पोलिस चंद्रकांत पवार ,सातारा सहकारी बँक ,संचालक अविनाश नालबिलवार,पवार सर,.अशोक जाधव सर, राजाराम आण्णा सावंत, दत्तात्रय व्यवहारे, दशरथ आबा जाधव, तुकाराम मस्के सर, समाधान गाजरे, महादेव तळेकर सर, नवनाथ रणदिवे सर,  शिवाजी गायकवाड सर, किरण घोडके आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here