विठ्ठल प्रमाणे “चंद्रभागे”वर सुद्धा “जादूची कांडी” फिरवावी ही खुद्द सभासदांचीच इच्छा! आता नवी विट्टी नवा दांडूच! सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील नाराजीच्या सूराचा फटका बसणार का?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची म्हणजेच ‘चंद्रभागेची’ निवडणूक तोंडावर आली आहे.
सध्या स्व.वसंतराव काळे यांचे चिरंजीव कल्याणराव काळे यांची सत्ता असून या कारखान्यावर अनेक वर्षापासून त्यांनी आपली सत्ता राखली आहे.पण काही काळापासून कल्याणराव काळे व त्यांचे संचालक मंडळ सभासदांची ऊस बिल थकबाकी, कारखान्यावर वाढत जाणारे कर्ज, कामगारांचे थकीत पगार,सिताराम साखर कारखान्याची विक्री व सभासदांची रक्कम परत न करणे या व इतर अनेक विषयांवरून चर्चेच्या भवऱ्यात अडकलेले दिसते. कारखान्याचे सुमारे 12000 सभासद असून गाळपास आलेल्या उसाची एफआरपी प्रमाणे बिले थकल्यामुळे सभासदांमध्ये नाराजीचा सूर पसरल्याचे दिसत आहे.कारखान्याची निवडणुक लवकरच घोषित होणार असून असून 6 साखर कारखाने यशस्वीपणे चालवून दाखवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखानदारीचे “आयकॉन” ठरलेले पंढरपूरचे उद्योगपती अभिजीतआबा पाटील यांनी चंद्रभागेची निवडणूक लावावीच व चंद्रभागा ताब्यात घेऊन विठ्ठल प्रमाणे चंद्रभागेवर सुद्धा “जादूची कांडी” फिरवून चंद्रभागा आणखी चांगल्या पद्धतीने चालवून दाखवावा व सभासदांच्या जीवनामध्ये आशेचा किरण निर्माण करावा अशी सभासदांचीच इच्छा सर्वत्र दिसून आली. काही ज्येष्ठ सभासदांनी आता “नवी विट्टी व नवा दांडूच” गरजेचा असल्याची प्रतिक्रिया मिस्कीलपणे नोंदवली. या नाराजीचा फटका विद्यमान सत्ताधाऱ्यांना बसणार का ? कारखान्याचे चेअरमन यांच्या खास पारखी नजरेतून भरल्या गेलेल्या व पै-पाहुणं,नाते संबंधातून घट्ट बांधलेल्या चंद्रभागेच्या सभासदांची मनं “सहकाराचे जादूगार” म्हणून लोकांच्या मनावर राज्य करणारे अभिजीतआबा जिंकू शकणार का? विठ्ठल पॅटर्न चा “जलवा” चंद्रभागेत चालणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सत्ता हातात असताना सुद्धा विठ्ठलच्या संचालक मंडळाला विठ्ठल चालू करता आला नाही, थकीत बिलांचा व पगारांचा प्रश्न सोडवता आला नसल्यामुळे व ‘नॉट रिचेबल’ झाल्यामुळे विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदादा भालके यांना डावलत विठ्ठलच्या सभासदांनी “सत्तेची वरमाला बळीराजासाठी जणू “देवदूत” बनून आलेल्या अभिजीत आबांच्या गळ्यात टाकली.सभासदांना दिलेला शब्द खरा करत “बोले तैसा चाले” याची प्रचिती देत अभिजीत आबाही विठ्ठल चे सर्व प्रश्न निकाली काढत खऱ्या अर्थाने “हिरो” ठरले. बंद पडलेला सांगोला सहकारी व विठ्ठल सहकारी साखर कारखाना एका महिन्यात चालू करून स्वतःला सिद्ध केलेले अभिजीत आबा आज सहकारात “मोस्ट वॉन्टेड” ठरलेले आहेत. याचीच पुनरावृत्ती चंद्रभागेत होऊन जुन्या संचालक मंडळाला “झिरो” ठरवत अभिजीत आबा पुन्हा एकदा “हिरो” ठरणार का? “बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले॥” या उक्तीप्रमाणे चंद्रभागेचे सभासद आजारी कारखाने बरे करण्यात हातखंडा असलेले सहकाराचे “स्पेशालिस्ट डॉक्टर” अभिजीतआबा हे चंद्रभागेला सुद्धा विठ्ठल प्रमाणे नवसंजीवनी देऊन गतप्राण होण्यापासून वाचवणार का? एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल अशा पद्धतीने विठ्ठल मधे एन्ट्री मारलेले हिरो अभिजीतआबा जुन्या सत्याधार्‍यां च्या मगर मिठीतून चंद्रभागेला सोडवून पुन्हा एकदा “रियल हिरो” ठरणार का? अशा चर्चांना पंढरपूर तालुक्यात उधाण आले असून संपूर्ण तालुका ढवळून निघाला आहे. सहकारातील जुन्या दिग्गज मंडळींनीही अभिजीत आबा रुपी “नव्या अवताराचा” धसका घेतल्याची चर्चा खेड्यातील पारा पारावर रंगत असून पुढे काय होणार हे पाहण्यासाठी “घोडा व मैदान” जवळच आहे असे म्हणत सर्वच राजकीय गटांच्या कार्यकर्त्यांच्या बाहुंमधे स्फुरण चढल्याचे व एकमेकांना आव्हान देतानाचे चित्र कार्यक्षेत्रात सर्रास दिसत आहे. सध्याच्या बिघडलेल्या वातावरणामध्ये वादळी वार्याची दिशा मात्र “विठ्ठल” कडून “चंद्रभागे” कडे वळली आहे हे मात्र निश्चित!

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here