विठ्ठल-दामाजी तो झॉंकी है भीमा अभी बाकी है हि प्रचारतुतारी यंदा भीमाला लागू नाही तुलनाच चुकिची! सर्व प्रश्न महाडिक साहेबांनी सोडविले! भीमात परिवर्तनाची ईच्छा म्हणजे तर्कसंगत नसलेला कल्पनाविलास! एक दिवास्वप्न! -प्रा.संग्रामदादा चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठल व दामाजीमध्ये सत्तापरिवर्तन झाले. व आता भीमा मध्ये सुद्धा परिवर्तन होणार असे भर दिवसा दिवास्वप्न काही विघ्नसंतोषी मंडळी पाहत असून हतबल झालेले विरोधक महाडिकांच्या पराभवासाठी देव पाण्यात बुडवून बसलेले दिसत आहेत.विठ्ठल- दामाजी यह तो झॉंकी है भीमा अभी बाकी है या जुन्याच प्रचारतुतारीचा जरी विरोधक वारंवार पुनरुच्चार करत असले तरी हा गैरलागू चुकिचा प्रचार यंदा तरी भीमाला निवडणूक प्रचारात अजिबात लागू होऊ शकत नाही. असा संबंध जोडणे म्हणजे हा तर अतिव इच्छेतून तयार झालेला व तर्कसंगत नसलेला केवळ “कल्पनाविलास” असून दिवसा पाहीलेलं एक “दिवास्वप्नच”आहे.भीमारुपी जंजिऱ्याच्या तटबंदी मजबूत!सुनामी सुद्धा ओसरेल

विठ्ठल-दामाजीची पार्श्वभूमी व खा. धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीची घोडदौड करत असलेला भीमा कारखाना यांची कोणत्याही बाबतीत कुठलीही तुलनाच होऊ शकत नाही.भीमाबाबत कुठेही परिवर्तनाची लाट नाही आणि कसलीही सुनामी लाट सुद्धा धडकून ओसरेलच एवढ्या ‘भीमा’रुपी जंजिरा किल्ल्याच्या विकासरूपी तटबंदी मजबूत आहेत. कारण भीमाने शेतकऱ्यांची सर्व थकीत बिले “निल”केली आहेत. कामगारांचे अलीकडच्या काही थकीत पगारांचीही आर्थिक तरतूद होत आहे.वाहतूक दारांची बीले दिली आहेत.त्यांना पुढील ॲडव्हान्स दिले आहेत.पूर्वी ‘तू का मी’ या दोघांच्या भांडणात रखडलेले एक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प महाडिकसाहेबांनी पूर्ण करून दाखविले आहेत.विरोधकांनी मुद्दाम निर्माण केलेल्या अनंत अडचणींवर मात करून 5 लाख टनाचे गाळप करून दाखवले आहे.15 कोटींची वीज विकून दाखवली आहे.आगामी हंगामसाठी भीमा पूर्ण ‘सज्ज’ आहे. शासन दरबारी वजन असलेला व प्रसंगी वडिलोपार्जित जमीन गहाण टाकून हंगाम यशस्वी करणारा खासदार चेअरमन भीमाला लाभला आहे.ते कधीही “नॉट रिचेबल” झाले नाहीत.कर्जांची व्याजं नियमित भरली जात आहेत.भविष्यात फायदेशीर ठरणार्या इथेनॉल प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.संस्थेची सर्व आघाड्यांवर प्रगती सुरू आहे. आता एकूणच सभासद व कामगारांची कसलीही तक्रार राहिलेली नाही. विरोधकांना अपप्रचारासाठी मुद्दाच राहिलेला नाही. दामाजी-विठ्ठल चे प्रश्न वेगळे होते तर भीमा पुढील सर्व प्रश्नांची उत्तरे महाडीक साहेबांनी ‘आपल्या कृतीतून’ दिलेली असून आता जर निवडणुक बिनविरोध द्यायची नसेल तर विरोधकांचे उरले सुरले वस्त्रहरण सभासदच करून दाखवतील.त्यामुळे परिवर्तनाचा विषय तर दूरच उलट गेल्या निवडणुकी पेक्षा दुप्पट मताधिक्यानी भीमा परिवाराला सभासद विजयी करणार असा सर्व सभासदांमध्येच विश्वास दिसत आहे.

चौकट-

प्रा.संग्रामदादा चव्हाण, जिल्हाध्यक्ष, किसान काँग्रेस

असे प्रतिपादन भीमा परिवाराचे संघटक समन्वयक व महाडिक साहेबांची योग्य व सत्य बाजू सभासदांपुढे मजबूतपणे मांडण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून प्रयत्नशील असलेले, धाडसाने पुढे आलेले व पडत्या काळातही शर्थीने खिंड लढविली म्हणून “भीमाचे बाजीप्रभू”
म्हणून भीमाच्या सर्व सभासदांच्या कौतुकास पात्र ठरत असलेले टाकळी सिकंदरचे विनम्र,सुशिक्षित, धडाडीचे,लोकप्रिय, अष्टपैलू व अभ्यासू युवानेते प्रा.संग्रामदादा चव्हाण यांनी विचारविनिमय गावभेटदौ-या दरम्यान जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here