विठ्ठलचं थकीत बिल दिल्याशिवाय मोळी टाकणार नाही-अभिजीत पाटील (कोर्टी व भंडीशेगाव बैठकीत शेतकरी सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठल परिवारातील एकाही माणसाला उघडं पडू देणार नाही. -अभिजीत पाटील

सध्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत पंढरपूरचे युवा नेते अभिजीत पाटील हे गावोगावी सभासदांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत आपण मतरुपी आशीर्वाद दिल्यास विठ्ठलच्या सभासदांची थकीत असलेली ऊसबिले दिल्याशिवाय मोळी टाकणार नाही” असे प्रतिपादन श्री विठ्ठल परिवर्तन विकास पॅनेलचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी भंडीशेगाव येथील बैठकीत बोलताना विठ्ठलच्या सभासदांना उद्देशून केले.काल कोर्टी व भंडीशेगाव येथे विठ्ठल परिवर्तन पॅनल च्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.

ज्या काट्यावर ऊसाचे वजन घेईन त्याच काट्यावर साखरेचे वजन केले जाईल. सभासदांनी त्यांचा ऊस कोणत्याही काट्यावर वजन करून गाळपास आणावा असे ते म्हणाले. तसेच साखरेला चांगला दर मिळावा असे वाटत असेल तर जागतिक बाजारपेठेची माहिती असावी लागेल.तरच साखरेला चांगला दर मिळेल तसेच भविष्यात इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येणार असून यामुळे ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

विठ्ठल कारखान्याच्या बंदच्या काळात आपण विठ्ठलच्या सभासद ६ हजार शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला.मात्र आता मतासाठी गावोगावी फिरणाऱ्या सत्ताधारी गटाने किती शेतकऱ्यांना मदत केली ते सांगावे? शेतकऱ्यांना मदत करण्याच्या वेळी तुम्ही नॉट रीचेबल असता आणि आता मते मागताना आपल्या वडील आणि आजोबांचा वारसा सांगत फिरता हा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा घणाघाती आरोपही त्यांनी सत्ताधारी गटाचे नाव न घेता केला.

विठ्ठलच्या निवडणूकीसाठी मत टाकायला जाताना प्रत्येक सभासद शेतकऱ्याने छातीवर हात ठेवून हा विचार करावा की बंद पडलेला विठ्ठल कारखाना कोण चालवू शकतो, कारखाना चालवणारा माणसांला आपले मत द्यावे अशी विनवणीही त्यांनी उपस्थित सभासद शेतकऱ्यांना केली.तसेच काहीही झालं कोणतीही अडचण आली तरी विठ्ठल परिवारातल्या कोणत्याही माणसाला उघडं पडू देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here