विजयराजजी डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुळूज येथे शैक्षणिक साहित्य वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विजयराजजी डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुळूज येथे शैक्षणिक साहित्य वाटप

सोलापूर // प्रतिनिधी

अर्थ व बांधकाम समिती सभापती मा श्री विजयराजजी डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त विजयराजजी डोंगरे मित्र मंडळ पुळूज व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळुज येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊ वाटप करण्यात आले. या अभिनव उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक श्री तुकाराम गायकवाड सर यांनी सर्व उपस्थितांचे व संयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमास रतिलाल गावडे, लिंगादेव निळगुंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, सदस्य राजू माने, शहीद धनाजी व्हनमाने यांचे वडील तानाजी व्हनमाने, सागर सोनवले सर, विठ्ठलराव टाकळे सर, अश्रुभान येळे, बापू शिंदे, प्रकाश खरात आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच दादांच्या वाढदिवसानिमित्त पुळूज शाळेत तसेच गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. विजयदादांनी यापूर्वी शाळेसाठी दुरूस्तीसाठी तीन लक्ष रूपयांची तरतूद केली असल्याचे व या वर्षी देखील तीन लक्ष रूपयांची तरतूद करण्याची ग्वाही दिल्याचे श्री दत्तात्रय पांढरे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास मर्यादित पाच विद्यार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात बोलवण्यात आले व त्याच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच सर्व कोव्हिड नियमांचे पालन करत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन निरगिडे सर यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here