वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतीचे व घराचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी प्रणव परिचारक यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील शेतीचे – घरांचे मोठे नुकसान झाले. याबाबत आज प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी. अशी मागणी भाजपा व पांडुरंग परिवाराचे युवानेते प्रणव परिचारक यांनी केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये फुल चिंचोली येथे सर्वाधिक शेतीचे नुकसान झाले याचीच पाहणी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव परिचारक यांनी केली . डाळिंब, द्राक्ष, आंबा अशी फळपिके नुकसानीत गेली. अगोदरच झालेल्या अवकाळी पाऊस आणि यानंतर आता पुन्हा वादळी वाऱ्याचे संकट आल्याने शेतकरी आता हवालदिल झाला आहे. याबाबत परिचारक यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शेतकऱ्यांच्या नुकसानीची आपण प्रत्यक्ष पाहनी करून पंचनामे करण्याची विनंती केली.

ग्रामीण भागासह शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक घरांचे पत्रे उडून गेले. अशा घरांची देखील माहिती घेऊन परिचारक यांनी पाहणी केली.

जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील, आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकसान ग्रस्त नागरिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली असल्याचेही यावेळी प्रणव परिचारक म्हनाले आहे. तसेच प्रशांतराव परिचारक यांच्यावतीने शेतकरी, नुकसानग्रस्त नागरिकांना मानसिक आधार देत त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.

वाऱ्याने शेतीच्या नुकसान सोबत अनेक शेतीवरच्या वस्तीवरील पत्र्याची घरे देखील उडून गेली. त्यामुळे अनेकांचे संसार देखील उघड्यावर आले आहेत अशा कुटुंबांना देखील प्रणव परिचारक यांनी भेट देऊन मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. तसेच शासकीय मदत आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या माध्यमातून आपण शासन दरबारी पाठपुराव करू असेही परिचारक यांनी आश्वस्त केले. यावेळी भाजपा व पांडुरंग परिवारातील कार्यकर्ते ज्येष्ठ मार्गदर्शक नेते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here