लोटस इंग्लिश स्कूल भारतातील उच्च पुरस्काराने सन्मानित!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

लोटस इंग्लिश स्कूल भारतातील उच्च पुरस्काराने सन्मानित!

पंढरपूर // प्रतिनिधी

पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल या शाळेस ‘हेगर्स एज्युकेशन इन बार्टी कमिटी’ व इलेट्स टेक्नो-मीडिया नोएडा, उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रात दिला जाणारा ‘शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम’ हा प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असलेला पुरस्कार लोटस इंग्लिश स्कूलला नुकताच देण्यात आला.
लहान मुलांना शिक्षण देवून अल्पावधीत विकास दाखविलेल्या व सन २०१० साली स्थापन झालेल्या कासेगावच्या लोटस इंग्लिश स्कूलला दि.२६ जून २०२१ रोजी हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे हे १९ वे वर्ष आहे. तर प्रशस्तीपत्रावर इलेट्स टेक्नो-मीडिया नोएडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी गुप्त यांची स्वाक्षरी आहे. याबाबत असिस्टंट मॅनेजर व्हर्टिकल एज्युकेशन, उत्तर प्रदेश च्या आशुतोष दुबे यांनी ही पुरस्कार संबंधी माहिती दिली. यावेळी लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ. जयश्री भोसले यांनी पुरस्काराबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘सध्या कोरोना ची परिस्थिती असताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे शाळेत वैज्ञानिक उपक्रम, रस्ते वाहतूक नियंत्रण, खेलो इंडिया, फिट इंडिया, पोस्टर मेकिंग, ट्रेनिंग प्रोग्रामिंग, कॉम्प्युटर कोडींग तसेच कोरोनाच्या या जागतिक महामारीवर आधारित निबंध स्पर्धा इ. व्हिडिओ बनवून शैक्षणिक उपक्रम राबवले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करणे, तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे आदी क्रिया सुलभ होतात. लोटस इंग्लिश स्कुल ला यापुर्वी ‘नॅशनल स्कूल अवार्ड’ ने सन्मानित करण्यात आले होते. लोटस इंग्लिश स्कूलने जपानच्या टोकियो मधील यारोकी कंपनी सोबत गणितीय करार केलेला आहे. त्याद्वारे गणिताचे शिक्षण देऊन गणित सोप्या भाषेत शिकवणे, भाषा प्रयोगशाळा द्वारे भाषेचे उत्तम ज्ञान देणे, उत्कृष्ट प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सी.सी.टी.व्ही. कॅमेराद्वारे शाळेवर व विद्यार्थ्यांवर नियंत्रण, सुसज्ज ग्रंथालय, दरवर्षी टीचर ट्रेनिंग प्रोग्राम राबविणे, शैक्षणिक सहल राबविणे, फिल्डवर्क राबविणे, समाज प्रबोधन करणे, अनाथ मुलांना अन्नदान करणे, पाणी वाचवा अभियान, न्यायालयातर्फे कायदेविषयक शिबीर, केंद्र सरकारचे गोवर रुबेला अभियान, मुलींच्या स्वसंरक्षणासाठी जुडो, कराटे, बॉक्सिंग इ. प्रशिक्षण देणे, विविध मैदानी क्रीडा राबविणे, विविध महापुरुषांच्या जयंत्या व सण साजरे करणे इत्यादी उपक्रम चांगल्या रीतीने राबवीत आहोत’. अशी माहिती शाळेच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी दिली. शाळेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग यांचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, अध्यक्ष श्री. एच.एम.बागल, उपाध्यक्ष श्री. बी.डी.रोंगे, खजिनदार श्री. दादासाहेब रोंगे, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here