लुप्त होत चाललेली ‘वार्ताफलक’ परंपरा पंढरीत पुन्हा झाली सुरु! पांडुरंगतात्या माने फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

लुप्त होत चाललेली ‘वार्ताफलक’ परंपरा पंढरीत पुन्हा झाली सुरु!

पांडुरंगतात्या माने फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर (प्रतिनिधी):- आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक दैदिप्यमान परंपरा महापुरुषांनी सुरु केल्या, त्यापैकीच एक सांस्कृतीक व सामाजिक परंपरा म्हणजे, ‘वार्ताफलक’ ही होय. काळाच्या ओघात ही परंपरा नामशेष होत असतानाच आज पंढरीतील पांडुरंगतात्या माने फाऊंडेशनने ही उज्जवल परंपरा पुन्हा सुरु केलीय.

पंढरपूरमधील अनिल नगर व झेंडेगल्ली परिसरातील प्रमुख चौकात ‘पांडुरंगतात्या माने फाऊंडेशन’ या वार्ताफलकाचे अनावरन स्थानिक जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. कैलास शेटे, बबन श्रीखंडे, नागेश जाधव, चंद्रकांत साळुंखे, राहुल जाधव यांना या वार्ताफलकाच्या अनावरनाचा मान देण्यात आला.

डिजीटलच्या युगात वाचन संस्कृती मागे पडत असताना व मोबाईलचा अतिवापर होत असताना आपली भावी पिढी पुन्हा एकदा वाचन संस्कृतीकडे वळावी, सुविचार व विविध सांस्कृतीक कार्यक्रम, सण, उत्सव याची माहिती परिसरातील अबालवृध्दांपासुन सर्वांना मिळावी या उद्देशाने ‘पांडुरंगतात्या माने फाऊंडेशन’ चे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांच्या संकल्पनेतून या वार्ताफलकाची उभारणी करण्यात आली.

मोबाईलमुळे मुलांच्या आरोग्यावर व मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असुन आपल्या समाजातील भावी पिढी पुन्हा मैदानात मैदानी खेळ खेळण्यासाठी उतरावी तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही ‘पांडुरंगतात्या माने फाऊंडेशन’ च्या माध्यमातुन याआधीच प्रयत्न सुरु केले आहेत. पुर्वी पंढरपुर शहराच्या चौफाळ्यात, नाथ चौकात व कांही प्रमुख चौकात नामफलक असायचे, त्यावर शहरातील दिवसभराचे प्रमुख कार्यक्रम, सण, उत्सव आदींची माहिती असायची तसेच दररोज नवनवीन सुविचार वाचायला मिळायचे, परंतु हल्ली ही पंढरपुरातील दैदिप्यमान परंपरा नामशेष होत चाललेली आढळून आल्याने आम्ही पुन्हा एकदा ही परंपरा टिकवण्याच्या उद्देशाने ‘पांडुरंगतात्या माने फाऊंडेशन’ च्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन या वार्ताफलकाचे अनावरण केले असुन आता यावर दररोज वरीलप्रमाणे महत्वपुर्ण माहिती नागरिकांना वाचावयास मिळेल. अशी माहिती ‘पांडुरंगतात्या माने फाऊंडेशन’ चे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी दिली. यावेळी फाऊंडेशनचे सदस्य उमेश जाधव, साईराम सुरवसे, अक्षय म्हेत्रे, महेश घुले, हर्षद सप्ताळ, सारंग दिघे, अनिल जाधव, अजय गवळी, ओम खरजदार, अमर शेटे, बबन शिंदे, ओम उपळकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here