लिंगेश्वर विद्यालय पुळुज येथे विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण समारंभ संपन्न! (खा.धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त लिंगेश्वर विद्यालय पुळुज येथे सुदर्शन कांबळे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

संसदरत्न खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिंगेश्वर विद्यालय पुळुज येथे महाडिक प्रेमी मा.सुदर्शन कांबळे यांच्या स्व: खर्चातून वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा,लिंबू चमचा स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा खाऊ वाटप आयोजित करण्यात आले होते.

या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी पुळूज विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विनोद विष्णुपंत महाडिक साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे तालुका उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे, गावचे उपसरपंच विनायक पाटील ,गावचे मा सरपंच भीवा शेंडगे, ज्ञानेश्वर कांबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनंता भाऊ पाटील, धनाजी सर्जे ,तानाजी शिंदे ,पिनू भोसले, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here