लसीकरणाचा वेग आणि चाचण्यांचे प्रमाण वाढवा प्रांताधिकारी-गजानन गुरव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

तालुक्यात ७० गावांत कोरोना बाधित रुग्ण; १५ गावांत १० पेक्षा अधिक रुग्ण

 पंढरपूर दि. २७:-  गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात वार्डस्तरीय व गावांत ग्रामस्तरीय समितीला लासीकरण मोहिमेत सहभागी करुन लसीकरणाचा वेग वाढवावा. तसेच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चाचण्याचे प्रमाण वाढवावे अशा, सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.   

                 वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  बैठकीस तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, प्रशिक्षणार्थी तहसीलदार श्रीकांत कांबळे, बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री मुखडे तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

           यावेळी प्रातांधिकारी गुरुव म्हणाले, तालुक्यात कोरोना संसर्गाच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून गावस्तरावर ग्रामस्तरीय समिती कार्यान्वित करण्यात यावी. तालुक्यातील कासेगांव, लक्ष्मीटाकळी, करकंब, भाळवणी, सुस्ते, वाखरी, गादेगाव, कोर्टी, गोपाळपूर, भोसे,चळे, खर्डी, रांझणी, गुरसाळे, पळशी  या १५ गावांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ५५  गावांमध्ये दहापेक्षा कमी कोरोना  बाधित रुग्ण असून,  तालुक्‍यातील एकूण ७० गावे कोरोनाग्रस्त आहेत. तर ३० गावांमध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्तरीय समितीने  विशेष खबरदारी घ्यावी. गावातील लसीकरण न घेतलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन लसीकरण करून घ्यावे.  तसेच लसीकरणाबाबत जनजागृती करावी. अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या

            शासनातील विविध योजनेचा लाभ घेताना नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सरकारी-निमसरकारी व खासगी कार्यालये तत्सम संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी-अधिकारी तसेच कामानिमित्त येणारे १८ वर्षावरील सर्व अभ्यगतांना लसीचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. ज्या नागरिकांनी लस घेतली नाही अशा व्यक्तींनी तात्काळ लस घ्यावी. शासन आणि प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन आपले गांव कोरोनामुक्त करावे असे, आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केले आहे. 

शहरात ३०२ तर ग्रामीणमध्ये ४३६ असे एकूण ७३८ रुग्ण बाधित असून, ६५ एकर येथील कोविड केअर सेंटरमध्ये 76 रुग्ण उपचार घेत असून, उप जिल्हा रुग्णालयात 06 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये 43 रुग्ण उपचार घेत आहेत. तर ६१३ नागरिक गृहविलगीकराणात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here