राष्ट्रीय लोकअदालतीत 268 प्रकरणे निकाली 8 कोटी 44 लाख  96 हजार 789 रुपयांवर तडजोड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर दि. (12):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 268 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये, एकूण    8 कोटी 44 लाख 96 हजार 789 रुपयांची  तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी. लंबे यांनी दिली.

     जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे दिनांक 12 मार्च  2022 रोजी या लोकअदालतीमध्ये प्रलंबीत 15 हजार 587 प्रकरणे  ठेवण्यात आली होती त्यापैकी 220 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच  2 हजार 644 दाखल पुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 48 प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशी एकूण 268 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत.  या  लोकअदालतीसाठी एकूण 6 पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये जिल्हा  न्यायाधिश न्यायाधीश एम.बी. लंबे, न्यायाधिश एस.एच.इनामदार, न्यायाधिश ए.पी. कराड, न्यायाधिश एम.आर. कामत, न्यायाधिश श्रीमती  एस.एस.खरोशे, न्यायाधिश एम.आर.जाधव यांनी काम पाहिले.

         या अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात, कौटुंबीक वादाची न्यायप्रविष्ट प्रकरणे तसेच बँका , वित्तीय संस्था, महावितरण यांची दाखल पुर्व प्रकरणे, पंचायत समिती घरकूल प्रकरणे तसेच पंढरपूर नगरपरिषदेची दाखलपूर्व प्रकरणे  ठेवण्यात आली होती. तसेच लोकअदालतमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. महिला पॅनलवर सर्व अधिकारी कर्मचारी  महिला नेमण्यात आल्या होत्या या पॅनलचे न्यायाधिश म्हणून श्रीमती  एस.एस.खरोशे यांनी काम पाहिले, असल्याचेही तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी. लंबे यांनी सांगितले.

       यावेळी  विधिज्ञ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष भगवान मुळे, विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here