राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा गायवाडी जिल्हा परिषद सर्कल गाव भेट दौरा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब भैय्या शेख ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत दादा वरपे, अमरावती जिल्ह्याचे निरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस करणभाऊ ढेकळे यांच्या सुचनेने व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे यांच्या मर्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभरात संघटनात्मक बांधणी च्या निमित्ताने शहर व ग्रामीण मध्ये दौरे आखण्यात येत आहेत या अनुषंगाने दर्यापूर ग्रामीण मध्ये संघटनात्मक बांधणी च्या दृष्टीने गायवाडी जिल्हा परिषद सर्कल क्षेत्रातील आमला , नांदेड , शिंगणापूर , दारापूर , या काही प्रमुख गावांना भेटी देत जिल्हा परिषद सर्कल प्रमुख , पंचायत समिती सर्कल प्रमुख , गाव प्रमुख , बूथ प्रमुख , पन्ना प्रमुख यांच्या नियुक्त्या करून पक्ष संघटन मजबूत करत सोबतच सर्व सामान्य लोकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयन्त करता यावेत व सर्व सामन्यांच्या हिताच्या नव नवीण योजना राबविता याव्यात यादृष्टीने पक्ष संघटन अधिक महत्त्वाचे आहे यानिमित्त या दौऱ्याचे आयोजन केलेले होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. सुशील गावंडे, जिल्हाउपाध्य विपीन शिंगण, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ग्रामीण नितिन गावंडे, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष शफन पटेल , राष्ट्रवादी वक्ता सेल चे तालुका अध्यक्ष मुकेश डाहेकर,
शिंगणापूर पंचायत समिती प्रमुख श्रेयस ढवळे, तोसिफ पटे, मो वासिम मो इसा, बाला ठाकूर, मो अयाझ मो इस्राईल, अब्दुल मुकिम अब मझिद पटेल, अभिजित इसल, कुणाल इंदुर्क,निखिल पाठक, चेतन इंदूर्क ,मो नईम मो इसा, शिंगणापूर येथील महेंद्र हरणे, नितीन पाटील , वैभव हरणे, प्रज्वल मावंदे, आदित्य हरणे, रितेश मालोकार, हर्षल धुमाळे, शाम पांडे, वैभव पाटील राऊत इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here