राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे खानदेश व मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर रवाना

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे खानदेश व मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर रवाना

(संघटनात्मक बांधणीवर भर देणार:- नागेश दादा फाटे)

सोलापूर // प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नागेश फाटे यांनी नुकताच खानदेश दौरा सुरू केला आहे. व्यापार आणि उद्योग विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर पडताच, त्यांनी पक्षीय कामकाजास सुरुवात केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत. आता त्यांनी आपला मोर्चा खानदेशकडे वळविला आहे. बुधवार दि.२५ ऑगस्ट रोजी, त्यांनी आपल्या पुढील दौऱ्यासाठी प्रयाण केले आहे.

पंढरपूर तालुक्यातील यशस्वी उद्योजक आणि राष्ट्रवादीच्या उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, हे सध्या राज्यातील दौऱ्यामध्ये व्यस्त आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली. प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळींची भेट घेतली , आणि आशीर्वाद घेत आपल्या कार्यास सुरुवात केली. गेल्या पंधरा दिवसांत त्यांनी मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. त्या त्या ठिकाणची राष्ट्रवादीची मुख्यालये आणि पदाधिकार्‍यांच्या भेटी घेत, पक्षीय संघटन मजबूत करण्यावर भर दिला.

*राज्यातील चंद्रपूर, गोंदिया भंडारा,नागपूर, वर्धा, यवतमाळ,अमरावती, अकोला, वाशिम, आणि बुलढाणा जिल्ह्यातील दौरा यशस्वी केला*.

सध्याचा कोरोना काळ आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेत आपल्या दौऱ्याचे शिस्तबद्ध नियोजन नागेश फाटे यांनी केल्याचे दिसून येते. प्रत्येक जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे आमदार, याशिवाय राष्ट्रवादीचे जिल्हानिहाय पदाधिकारी यांच्या शिस्तबद्ध बैठका पार पाडल्या आहेत. पक्षातील संघटन मजबूत करण्यावर आपला भर राहणार असल्याची प्रतिक्रिया नागेश फाटे यांनी दिली आहे.

बुधवारी सकाळी पंढरपूरमधून त्यांनी मराठवाड्यातील काही जिल्हे आणि खानदेश दौऱ्यासाठी प्रयाण केले. बीड जिल्ह्यातील केज आणि परभणी येथील बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी परभणी आणि हिंगोली, शुक्रवारी जालना आणि औरंगाबाद, शनिवारी जळगाव आणि धुळे, रविवारी नंदुरबार आणि नाशिक, सोमवारी नाशिक आणि अहमदनगर तर मंगळवार दि. ३१ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यात त्यांचा नियोजित दौरा पार पडणार आहे.

मोजके आणि शिस्तबद्ध कार्यकर्ते तयार करणाऱ्या, पंढरपूर तालुक्यातील कल्याणराव काळे गटातून आपल्या राजकारणाची सुरुवात करणारे नागेश फाटे, हे अतिशय शिस्तबद्ध नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. उद्योग आणि व्यवसायातील आजवरची त्यांची घोडदौड वाखाणण्यासारखीच आहे. राष्ट्रवादीची धुरा खांद्यावर घेतलेले नागेश फाटे , हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटन कार्यात गुंतलेले आहेत. त्यांच्या शिस्तप्रिय आणि जिद्दी स्वभावाचा, राष्ट्रवादी पक्षाला निश्चितच फायदा होणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here