राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना दिले निवेदन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

उद्योग ,व्यापारा बरोबरच तरुणांच्या हातालाही काम मिळण्यासाठी एम.आय.डी.सी.च्या मंजुरीची मागणी

 

पंढरपूर तालुक्यामध्ये एम.आय.डी.सी.मंजूर व्हावी यासाठी राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मा.नागेशदादा फाटे यांच्या वतीने महाराष्ट्राचे कर्तत्वदक्ष मुख्यमंत्री ना.उध्दवसाहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये सर्व प्रकारची माहिती देण्यात आली आहे, यामध्ये पंढरपूर परिसरात मनुष्यबळ व दळणवळणाचे सर्व महामार्ग उपलब्ध आहेत. परंतु साखर उद्योग सोडून इतर कोणतेही मोठे उद्योग धंदे याठिकाणी नाहीत. यामुळे चांगले शिक्षण घेऊनही नोकरीची संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगाराचे प्रमाण वाढलेले आहे.

यामुळे पंढरपूर तालुक्यात एम.आय.डी.सी.मंजूर झाल्यास येथील तरूण युवकांना रोजगाराची संधी निर्माण होणार असून ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगाराचा प्रश्न कायमचाच मार्गी लागणार आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी एम.आय.डी.सी.मंजूर व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सुभाष बागल, वृक्षमित्र बिल्डर दत्ता बागल, पै.साहेबराव नागणे, मा.ग्रा.सदस्य गणेश बागल, विजय जाधव, तुकाराम बागल, निवृत्ती पाटील, अतुल मस्के आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here