रामभाऊ जोशी हायस्कूलमध्ये नविन मुख्याध्यापकपदी हेमंत कदम यांची नियुक्ती

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

रामभाऊ जोशी हायस्कूलमध्ये नविन मुख्याध्यापकपदी हेमंत कदम यांची नियुक्ती

 

सोलापूर // प्रतिनिधी

देशातील अग्रगण्य,नावलौकिक दयानंद अग्लो वैदिक(डी.ए.व्ही) शैक्षणिक संस्थेच्या ग्रामीण भागातील करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूलच्या कायम मुख्याध्यापक पदी श्री हेमंत कदम यांची नेमणूक झाल्याबद्दल आणि पर्यवेक्षक पदी धनवंत करळे यांची निवड झाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती व शालेय शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.प्रथम ग्रामपंचायत कार्यालयांमध्येही उपसरपंच आदिनाथ देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य शरदच्चंद्र पांढरे ,सचिन शिंदे, राहुल शिंगटे, विवेक शिंगटे ,हनुमंत बाबर, विशाल देशमुख उपस्थित होते.
तर
यावेळी शाळेच्या भौतिक सुविधा बरोबरच “शैक्षणिक गुणवत्ता पूर्ण ग्रामीण शाळा” करण्याचा मानस असून या पंचक्रोशीतील सर्व सोयीसवलत युक्त माध्यमिक शाळा, विद्यार्थ्यांना क्रिडाक्षेत्रातील नावलौकिक मिळविण्याचा आणि प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना “माझी शाळा, माझा अभिमान” वाटावा असे कार्य करणार असल्याचे नुतन मुख्याध्यापक हेमंत कदम यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रम,शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण या घटकांचे नियोजन सर्व शिक्षकांच्या मदतीने करणार असल्याचे मनोगत नुतन पर्यवेक्षक धनवंत करळे यांनी व्यक्त केले.
यावेळी शालेय मार्गदर्शक जि.प.माझी अध्यक्ष बाबुराव जाधव,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण वंजारी,पत्रकार मनोज पवार यांनीही सत्कारपर मार्गदर्शन व आपले मनोगत व्यक्त केले
या सत्कार कार्याक्रमाला संजय मोहीते,संजय धोत्रे,मारूती व्यवहारे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले आणि विनय कुलकर्णी यांनी सर्वाचे आभार मानले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here