राज्यातील साखर कारखान्यांना आयुक्तांचा फटका?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

राज्यातील अनेक साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. राज्यात सध्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांना मोठा दणका दिली आहे. गाळप हंगामाला सुरुवात झाली असली तरी राज्यातील 43 साखर कारखान्यांना परवानाच दिलेला नाही. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची 300 कोटींची एफआरपी थकवली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे दिले जाणार नाही, तो पर्यंत गाळप परवाना मिळणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. परवाना रोखण्यात आलेल्या साखर कारखान्यांमध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आयुक्त कार्यालयाने दणका दिला आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचे पैसे देणार नाहीत तोपर्यंत परवाना दिला जाणार नाही. कारखान्यायने ऊस बिलाचे चेक शेतकऱ्यांना दिले. मात्र, चेक बाऊन्स झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. त्यांची दखल घेत गायकवाड यांनी प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिली आहेत.

राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार

शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे पैसे न दिल्याने परवाने रोखले आहेत. एफआरपी द्या मगच परवाना मिळणार, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय महाडिक, समाधान आवताडे, संजय काका पाटील, बबनराव पाचपुते या नेत्यांचा समावेश आहे. त्याच बरोबर शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्या कारखान्याचाही समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संबंधित कारखाने आहेत.

 

कोणत्या साखर कारखान्यांचा परवाना रोखला?

वैद्यनाथ कारखाना, परळी. रामेश्वर कारखाना, जालणा. इंद्रेश्वर आणि कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना, इंदापूर. राहुरी कारखाना, अहमदनगर, संत दामाजी कारखाना, यशवंत कारखाना आणि एस जी झेड, तासगाव, साईकृपा कारखाना, भैरवनाथ शुगर, चंद्रभागा कारखाना, मकाई कारखाना, सिद्धनाथ कारखाना, आयन मल्टीट्रेड (बाणंगा ससाका भूम), घूष्णेश्वर शुगर औरंगाबद, रत्नप्रभा (गो. दूधना) रेणुका नांदेड, मोतीश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट सोलापूर, त्रिधार (नरसिंह) नांदेड, अंबेजोगाई औरंगाबाद,भाऊसाहेब बिराजदार, सोलापूर, युटेक शुगर अहमदनगर, किसनवीर सातारा, शंकर सोलापूर, कंटुरकर शुगर (जय अंबिका) नांदेड, किसरनवीर भुईंज पुणे, साईबाबा नांदेड, निरा-भिमा पुणे, टोकाई ससाका नांदेड, भैरवनाथ सोलापूर, डॅा. बा. बा. तनपुरे अहमदनगर, एम. व्ही. के. अॅग्रो नागपूर, सुभाष शुगर नागपूर, पनगेश्वर नागपूर, भिमा शंकर सोलापूर, रामेश्वर औरंगाबाद, सिद्धेश्वर औरंगाबाद, समृद्धी शुगर औरंगाबाद, व्यंकटेश्वरा खा. नागपूर, यशवंत-खानापूर कोल्हापूर, गडहिंग्लज कोल्हापूर, घोडगंगा पुणे, विश्वास कोल्हापूर, हु. कि. अहिर कोल्हापूर, आजरा कोल्हापूर, मकाई सोलापूर, जरंडेश्वर शुगर पुणे, इंदेश्वर शुगर सोलापूर, शरयु शुगर लि. पुणे, स. शि. वसंतराव काळे चंद्रभागा सोलापूर, विठ्ठल रिफायनरी सोलापूर, भिमा टाकळी सोलापूर.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here