राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार, म्हणाले, हा माझा स्वाभिमान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही.

बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता,असे संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी संभाजीराजे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
पुढचा प्रवास किती खडतर हे मला माहित आहे
राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढची वाटचाल कशी असणार अशी चर्चा होती. त्यावेळी मी दोन राजकीय निर्णय जाहीर केले होते. त्यावेळी मी बोललो होतो की राज्यसभा निवडणुक लढवणार आहे. पुढचा प्रवास किती खडतर आहे हे मला माहिती होते. मागील 15 ते 20 वर्षे मी काम करतो आहे. खासदारकी असताना समाजाची भुमिका मांडण्याचा प्रयत्न मी करत होतो. त्यामुळेच माझी इच्छा होती की सर्व पक्षांनी मिळून मला राज्यसभेत पाठवावं असे संभाजीराजे म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, शिवजी महाराज यांचं स्मारक असेल तिथं आपण दोघांनी जायचं आणि संभजीराजे खोटं बोलतायत का हे सांगायच असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा फोन
मला दोन खासदार भेटायला आले आणि त्यांनी मला सांगितलं की शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा. उद्या आपली उमेदवारी जाहीर करु. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचाही मला फोन आला. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं असेही ते म्हणाले. त्यांनी आम्हाला सांगितले की, छत्रपती आमच्यासोबत हवे आहेत. शिवसेनेत प्रवेश करावा असे त्यांनी सांगितले, पण मी त्यांना सांगितल की मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. त्यांना मी प्रस्ताव सांगितलं की, मला महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार घोषित करा. पण मुख्यमंत्री म्हणाले की, हे शक्य होणार नाही. परंतू ते म्हणाले की शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हा. त्यानंतर त्यांच्या एका मंत्र्यांचा फोन आला की आपण एक मध्यमार्ग काढू. त्यानंतर एक ड्राफ्ट तयार करण्यात आला. तो ड्राफ्ट माझ्याकडे आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ आलं. मुख्यमंत्र्यांचे एक स्नेही माझ्याकडे आले त्यांनी सांगितले की, शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा. त्यानंतर त्यांनी एक ड्राफ्ट मला सांगितला, तो ड्राफ्ट फायनल केला. त्यानंतर मी कागदपत्रे तयार करण्यासाठी कोल्हापूरला गेल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.
त्या आमदारांच्या पाठीशी आयुष्यभर उभा राहणार
कोल्हापूरला जाताना मी बातम्या पहिल्या की कोल्हापूरच्या एका व्यक्तीला उमेदवारी दिली. संभाजीराजे शिवबंधन बांधणार अशा बातम्या दिल्या गेल्या.यावेळी मी मुख्यमंत्र्यांना फोन केला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यांनी शब्द पाळला नाही. असेही संभाजीराजे म्हणाले. येमाऱ्या काळात विस्तापित मावळ्यांना एकत्र करण्याचे काम मी करणार आहे. मी स्वराज्यच्या माध्यमातून उभा रहाणार आहे. ज्या आमदारांनी सह्या केल्या त्यांच्या पाठीशी मी आयुष्यभर राहणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडूक लढवणार नाही शिवसेनेनं ऑफर दिली ती स्वीकारली असती तर मी खासदार झालो असतो. मला सर्व आमदार म्हणत आहेत की, आपण निवडणुक लढावावी. परंतू मला माहिती आहे त्याठिकाणी घोडेबाजार होणारं आहे असेही संभाजीराजे म्हणाले. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडुकीला समोर जाणार नाही, ही माझी माघार नसून हा माझा स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here