राजकीय कार्यक्रमात मरणाची गर्दी आणि पंढरीच्या वारीला पोलिसांची वर्दी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राजकीय कार्यक्रमात मरणाची गर्दी आणि पंढरीच्या वारीला पोलिसांची वर्दी

गावामध्ये पालखी येऊ नये हे ग्रामपंचायतचे मत असु शकते पण आमचे अन्नदात्याचे नाही आम्ही वारकऱ्यांची सेवा करू

सोलापूर // प्रतिनिधी

आळंदी ते पंढरपूर मार्गावरील गावकर्‍यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या असता माझी वारी माझी जबाबदारी या अनुषंगाने तीन जुलै ला कोरोना चे नियम पाळून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केलेले आहे त्या आयोजना मध्ये आपल्याकडून आम्हाला मुक्कामाची व भोजनाची व्यवस्था अपेक्षित आहे असे म्हणता बरोबर अन्नदात्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला
आणि मागील वर्षी पायी दिंडी सोहळा आमच्या गावात आला नाही म्हणून त्या सेवेला मी मुकलो ही खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली

महाराष्ट्रातील सर्व पांडुरंगाचे भक्त भगवंताच्या दर्शनाकरता आसुसलेले आहेत आणि सरकारने पायी दिंडी सोहळ्याला रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर 24 जून च्या आत फेरविचार करून वारकरी संघटनांशी संपर्क साधावा अन्यथा आम्ही माझी वारी माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करणार आहोत अशा प्रकारचे निवेदन सरकारला पाठवण्यात आले होते
पण 24 जून पर्यंत सरकारकडून कुठल्याही प्रकारचे प्रतिउत्तर मिळालेच नाही या उलट पंढरपूर मध्ये वारकऱ्यांना येताच येऊ नये म्हणून 17 जुलै येथे 25 जुलै पर्यंत त्रिसूत्री संचारबंदी लावण्यात आली आणि आळंदीवरून वारकऱ्यांना पायदळ दिंडी ला जाता येऊ नये म्हणून 28 जून ते 4 जुलै पर्यंत कडक संचारबंदी लावण्यात आली आहे
एकीकडे राजकीय नेत्यांचे मोर्चे, बैठका, प्रचार दौरे चालू आहेत आता पाच जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकी सुद्धा जाहीर केलेले आहेत तिथे कुठले प्रकारचे कोरोनाचे बंधन पाडल्या जात नाही आणि वारकरी सहिष्णू आहेत शांततेने नियमाचे पालन करून पायी वारी करायला तयार आहेत तर पायी वारी होऊ नये याकरिता कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त लावणे चालू आहे
पण आता वारकऱ्यांचा संयम सुटलेला आहे आणि वेळोवेळी सरकारला विनंती करून सरकार तिळमात्रही वारकऱ्यांच्या कडे लक्ष न देत असल्यामुळे येत्या 3 जुलैला महाराष्ट्रातील काही वारकरी संघटना मिळून आम्ही माझी वारी माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत किमान शंभर भाविकांच्या उपस्थितीत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे व इतरही वारकरी संघटना त्यांच्या परीने पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करतील अशी शाश्वती आहे
सरकारने वृत्तपत्राद्वारे जाहीर केले होते काही गावांमधून पायदळ दिंडी सोहळ्याला कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे विरोध दर्शविला जात आहे
म्हणून पायी दिंडी सोहळ्याचे मुक्काम व भोजनाची नियोजन करण्या करिता ह भ प गणेश महाराज शेटे व योगेश महाराज सुरळकर संघटनेच्या वतीने आळंदी ते पंढरपुर माऊली च्या सोहळ्यातील गावोगावी जाऊन विचारणा केली असता गावकरी मंडळी पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत
काही गावांमधून शासनाला ग्रामपंचायतच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला आणि या वर्षी आमच्या गावांमध्ये पायी दिंडी सोहळा नको ते विनंती करण्यात आलेली आहे परंतु ग्रामस्थ मंडळी चे म्हणणे असे आहे की दरवर्षी ज्याप्रमाणे गावांमध्ये किमान पाच लाख वारकरी येतात त्या संख्येने जर वारकरी गावांमध्ये आले तर निश्चितच गावांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढू शकतो पण मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जर आम्ही कोरोना चे सर्व नियम पाळून पायी वारी झाली तर वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळेल
ग्रामपंचायतच्या वतीने शासनाला गेलेल्या अहवालामुळे आमच्या गावा बद्दल विनाकारण झालेली आहे आम्ही आजपर्यंत वारकऱ्यांची तन-मन-धनाने फार मोठ्या प्रमाणात सेवा केलेली आहे आणि पुढेही करणार आहोत फक्त यावर्षी कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात वारकरी गावात न येता कमी संख्ये मध्ये पायी दिंडी सोहळा व्हावा ही आमची अपेक्षा आहे आम्ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गावामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्यास तयार आहोत असे मनोगत ह भ प श्री अशोक महाराज पवार यांनी व्यक्त केले व पायी दिंडी सोहळ्याचे नियोजन करण्याकरिता आलेल्या गणेश महाराज शेटे व योगेश महाराज सुरळकर यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले अशाच प्रकारचे वक्तव्य इतरही गावकऱ्यांनी व्यक्त केले पायी दिंडी सोहळा च्या नियोजनामध्ये ह-भ-प श्री भगवान महाराज गडदे व वारकरी संप्रदायातील विद्वान महाराज मंडळींचे मार्गदर्शन व योगदान गळत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here