यात्रेनिमित्त सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर शहरात मद्यविक्री बंद

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर प्रतिनिधी इदरीस सिद्दिकी यात्रेनिमित्त सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने सर्व देशी, सर्व विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या व ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणेसंदर्भात खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहे.कार्तिकयात्राउत्सव-2021 निमित्त पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील कलम 142 अन्वये दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी पंढरपूर शहरातील सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्‍त्या व सर्व ताडी विक्री अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत.महाराष्ट्र विदेशी दारु (रोखीने विक्री, विक्री रजिस्टर इ.) नियम 1969 चे नियम 9(अ)(2)(ब)(आठ) नुसार कार्तिक एकादशी दिवशी म्हणजेच दिंनाक 15 नोव्हेंबर 2021 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व एफएल-2,एफएल-3, एफएल-4,एफएलडब्ल्यू-2, नमुना ई-2, एफएलबीआर-2 अनुज्ञप्त्या बंद राहतील. महाराष्ट्र देशी मद्य नियम 1973 चे नियम 26(1)(ब)(आठ) नुसार कार्तिक एकादशी दिवशी म्हणजेच दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व सीएल-3 अनुज्ञप्त्या बंद राहतील.तरी जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्तीधारक व ताडी विक्री अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याअनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here