यमाई – तुकाई विकास निधीला नडला पंढरपूर तालुक्यातील अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा (अडीच कोटी निधीला पंढरपूरवासी मुकले) (संबधीतांवर कारवाईसाठी आ. आवताडे ऍक्टिव्ह मोडवर)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील दोन्ही तालुक्यात पर्यटन विभागाचा निधी मिळावा यासाठी आ. समाधान आवताडे यांनी पर्यटन विकास मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पाठपुरावा करून पाच कोटीचा निधी मिळावा म्हणून २०/०१/२०२३ रोजी पत्र देऊन यासाठी विनंती केली होती. यावरती मंत्री महोदय यांनी तत्काळ जिल्हाधिकारी यांना याबाबत तपासणी करण्याबाबत आदेश दिले होते. यानुसार जिल्हा नियोजन समितीकडून कार्यवाही करण्यात आली. यामध्ये फक्त मंगळवेढा येथील संबंधित अधिकारी यांनी अंदाजपत्रक सादर केल्याने त्याठिकाणी अडीच कोटी निधी मंजूर मंजूर होणार होता .मात्र पंढरपूर तालुक्यातील अंदाजपत्रक सादर न केल्याने हा निधी परत गेला आहे. दोन्ही तालुक्यातील कामाचे अंदाजपत्रक देण्यासाठी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करून देखील मंगळवेढा तालुक्यातील अंदाजपत्रक लवकर मिळाले व पंढरपूरचे लवकर मिळाले नाही त्यामुळे निधी मिळू शकला नाही यामुळे जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी आ आवताडे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

दोन्ही तालुक्यासाठी निधी मिळवीत असताना ,पंढरपूर येथील यमाई – तुकाई तलाव सुशोभीकरणासाठी दोन कोटी आणि अनवली येथील गाव तलाव सुशोभीकरण साठी ५०लाख असे एकूण अडीच कोटीची मागणी करण्यात आली होती. या मागणी नुसार पर्यटन मंत्री यांनी पुढे कार्यवाही सुरु केली होती.यामध्ये जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग २चे कार्यकारी अभियंता आणि पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना तात्काळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी सूचना दिली होती. मात्र वरील विभागाकडून वेळेत अंदाजपत्रक सादर न केल्याने पंढरपूर तालुक्यासाठी अडीच कोटींचा निधी मिळाला नाही. यासाठी जे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कडकं कारवाई करावी अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी ९एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार वजा मागणी केली आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये विविध विकास कामे व्हावी यासाठी अनेक विभागाकडून निधी मोठ्या प्रमाणावर मिळविण्यासाठी आ. आवताडे यांनी उचांक केला आहे.अशातच हा पर्यटन विभागाचा तब्बल अडीच कोटींचा निधी केवळ अधिकारी यांच्या बेजबाबदारपणामुळे मिळू शकला नाही.याचे श्यल्य आ. आवाताडे यांच्या मनात राहिले आहे.यामुळे आता आशा अधिकार यांना यापुढील काळात धारेवर धरून विकास कामे साधावी लागणार आहेत हे मात्र आता सिद्ध झाले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here