यंदा १० लाख टन गाळपांचे उद्दिष्ट:-खा.धनंजय महाडिक (भीमा सहकारी साखर कारखान्याची सर्व साधारण सभा संपन्न!)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना म्हणून गणल्या गेलेल्या व खासदार धनंजय महाडिक यांची गेली11वर्ष सत्ता असलेल्या भिमा सहकारी साखर कारखान्याची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.

अहवालावरील सर्व विषयांना सर्व सभासद शेतकऱ्यांनी हात उंचावून एकमताने संमती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन पांडुरंग (तात्या) यांनी केले.

या प्रसंगी बोलताना भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन तथा खासदार धनंजय महाडिक यांनी सर्व सभासद शेतकऱ्यांना कारखान्या पुढील अडचणी निर्माण झाल्या त्या आपल्या भाषणातून विशद केल्या. त्याचबरोबर, इथेनॉल निर्मितीचं महत्त्व सर्व शेतकऱ्यांना पटवून दिले!
आगामी हंगामामध्ये कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात ऊसाची नोंद झाली असून आम्ही दहा लाख टन ऊसाचे गाळप करणार आहोत. खा.धनंजय महाडिक पुढे म्हणाले कि बैलगाडी करार 400,मोठे ट्रॅक्टर एकूण करार 225,ट्रॅक्टरगाडी करार 600,हार्वेस्टर मशीन करार 7 करार करण्यात आला असल्याचे सांगितले.
यावेळी सभासदांना सांगितले त्याचबरोबर सर्व कामगारांना 12% टक्के पगार वाढ देणार असल्याचे व बोनसही देणार असल्याचे यावेळी खासदार महाडिक यांनी सांगितले. आम्ही सर्व तोडणी वाहतूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात कारखान्याकडे उपलब्ध असल्याचे यावेळी श्री धनंजय महाडिक यांनी यावेळी प्रतिपादन केले.

 

यावेळी विश्वराज (भैय्या) महाडिक,पवन (भैय्या) महाडिक, व्हा.चेअरमन सतीश (आण्णा) जगताप, शिवाजीराव गुंड-पाटील, प्रा.संग्राम चव्हाण,भाजपा तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, जेष्ठ सभासद उन्हाळे दादा,संचालक सुरेशआप्पा शिवपूजे, सुरेश (तात्या) सावंत, रामहरी (आप्पा) रणदिवे, महादेव देठे, बिभीषण (आप्पा) वाघ, चंद्रसेन (बापु) चव्हाण, आनंता चव्हाण, राजाराम बाबर, माणिक तात्या बाबर, किसन जाधव, भारत पाटील, भिमराव भाऊ वसेकर प्रशांत वसेकर, प्रशांत वसेकर, पोपटराव वसेकर, संतोष चव्हाण, पांडुरंग तात्या ताठे,चंद्रसेन बापू जाधव, राष्ट्रवादीचे पंढरपूरचे अध्यक्ष सुधीर (आबा) भोसले
सिद्धू बापू अनुसे बंडू अनुसे अजिनाथ अनुसे, अमोल चव्हाण , कारखान्याचे सर्व संचालक मंडळ कर्मचारी,अधिकारी आदि पदाधिकारी सर्व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here