मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतुदःआमदार रणजितसिंह मोहिते पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील आष्टी तलाव व आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे मोहोळ तालुक्यातील ११ गावे व माढा तालुक्यातील ३ गावे अशी एकूण १४ गावे सिंचनाखाली येणार आहेत.या योजनेच्या रखडलेल्या कामासाठी नागपुर हिवाळी अधिवेशनात मागणी केली होती त्यानुसार २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ४०कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली असुन त्याबद्धल त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहे यांचे आभार मानले आहेत.
आष्टी उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक -१, २०१५ साली कार्यान्वीत झाला असुन डावा कालवा मधील मातीकाम २०% अपुर्ण असीन बांधकामे ४०% अपुर्ण आहेत तर उजव्या कालव्यातील मातीकाम १०% अपुर्ण असुन बांधकामे २०% अपुर्ण आहेत,त्या दृष्टीने या कालव्याची उर्वरित कामांसाठी तसेच भुसंपादनासाठी निधी उपलब्द करुन देण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषद सभागृहात मागणी केली होती.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश येऊन या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात अधिवेशनात ४० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याने आहेत.मोहोळ तालुक्यातील आष्टी परिसर आता दुष्काळ व पाणी टंचाईच्या जोखडातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे त्यामुळे आष्टी लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे आभार मानले आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here