मोटर सायकल आडवून चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी गजाआड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोटर सायकल आडवून चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी गजाआड

 

वसमत शहर हद्दीतील दिनांक 31 मार्च 2021 रोजी कवठा पाटी जवळ फिर्यादी अभिलाष राजा रेडी येंगोड वय वर्षे 24 व्यवसाय फिल्ड ऑफिसर भारत फायनान्स इन्शुरन्स कंपनी, यांना अज्ञान दोन इसमाने मोटरसायकल अडवून चाकूचा धाक दाखवून त्याजवळील कंपनीचे वसूल केलेले १,६०,००० रू जबरीने चोरून नेले संबंधित वसमत शहर पोलीस स्टेशन येथे गुरन १२७/२१ कलम ३९२,३४ भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल होता.पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना सूचना दिल्या होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुराव्याचा बारकाईने अभ्यास केला व सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केले असता अशी माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा मुख्य आरोपी नामे विश्वजीत आनंदा शेंगारपुतळे वय वर्ष २६ व्यवसाय मिस्त्री रा. मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड उद्याचा साथीदार ओमकार उर्फ पमा सिताराम राव फुले वय वर्ष २१ व्यवसाय खाजगी नोकरी तसेच फिर्यादी चे पैसे लुटण्या बाबत टीप देणारा भारत फायनान्स इन्शुरन्स कंपनी वसमत येथील कर्मचारी आकाश रमेश जोंधळे वय वर्ष २५ व्यवसाय फिल्ड ऑफिसर भारत फायनान्स इन्शुरन्स कंपनी वसमत यांनी संगणमत करून आरोपी यांनी आरोपी तीन च्या सांगण्यावरून मोटरसायकलवर येऊन फिर्यादीस येथे चाकूचा धाक दाखवून फिर्यादीची पैशाची बॅग व मोबाईल जबरीने चोरून नेल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक घेवारे स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथक आरोपीच्या शोधात रवाना झाले. सदरील आरोपीची गोपनीय माहिती काढून मौजे मानसपुरी तालुका कंधार येथे मुख्य आरोपी नामे विश्वजीत आनंदा शिणगारपुतळे यास पकडून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपी 2 नामे ओमकार उर्फ पमा पिता राम राव फुले श्रीनिवास नांदेड येथून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आरोपी क्रमांक 3 आकाश रमेश जोंधळे फिल्ड ऑफिसर भारत फायनान्स इन्शुरन्स कंपनी याच्या सांगण्यावरून फिर्यादीचे लुटलेली रक्कम पैकी एक लाख 60 हजार रुपये एक मोबाईल होंडा शाईन कंपनीची मोटर सायकल एकूण २६५०००, मुद्देमाल जप्त केला आहे एक आरोपी हा भारत फायनान्स कंपनी मध्ये कामाला असल्यामुळे तसेच दुसरा आरोपी यापूर्वी भारत फायनान्स कंपनीचे काम केल्यामुळे कंपनीतील कर्मचारी अशा प्रकारे रोख रक्कम जमा करून कुठे नेत असतात याची माहिती असल्याने सदरील माहितीचा फायदा घेऊन गुन्हा केला आहे. पोलिसांनी गुन्हातील लुटलेली पूर्ण रक्कम १,६०,००० रु जप्त केली आहे. तसेच आरोपी त्यांनी पोलीस स्टेशन जिंतूर जिल्हा परभणी गुरण ३६३/२० कलम ३९२,३४ भा द वि प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यातिश देशमुख, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक अभय माकने , पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे, पोलीस अमलदार किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन चालक शेख जावेद, व जय प्रकाश झाडे, दीपक पाटील ने सायबर सेल हिंगोली यांनी केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here