मुन्नासाहेबांची राज्यसभेवरील निवड सार्थ! राईट मॅन इन राईट प्लेस! दिग्गजांमधे गणना! सर्व विजयी खासदारांचे भीमा परिवाराच्या वतीने अभिनंदन! -प्रा.संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

तज्ञ,विद्वान,अभ्यासू अनुभवी व बुद्धिमान व्यक्तींच्या ज्ञानाचा देशातील जनतेच्या सर्वांगीण विकासा साठी ऊपयोग व्हावा म्हणून राज्यघटनेच्या 80 व्या कलमानुसार निर्माण झालेल्या 250 सभासद संख्या असलेल्या राज्यसभा या वरिष्ठ समजल्या जाणाऱ्या व कधीही विसर्जित न होणाऱ्या अशा स्थायी सभागृहावर नवनिवड झालेल्या सर्व खासदारांसह खा.मुन्नासाहेब महाडिक यांचे भीमा परिवाराच्या वतीने परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्राम चव्हाण यांनी अभिनंदन केले.

यावेळी ते म्हणाले,” राज्यसभा ह्या वरिष्ठ सभागृहाचे संसदीय लोकशाही मध्ये असाधारण महत्त्व असून लोकसभेने पास केलेल्या कायद्यांची व निर्णयांची लोका- भिमुखता तपासून पाहून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये समन्वय ठेवण्याचे महत्त्वाचे काम राज्यसभेचे असते. सर्व पक्षातील बुद्धिमान व अनुभवी व्यक्तींना समान संधी मिळण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये विशेष तरतूद केलेली असते.विधानसभेच्या मतपत्रिकेवर पसंतीक्रम द्यावा लागतो.या क्लिष्ट प्रक्रियेमुळेच पक्षीय राजकारणातील
साठमारीची शिकार न होता विद्वान व्यक्तींची राज्यसभेवर निवड होत असते.लाल बहादूर शास्त्री, यशवंतराव चव्हाण, मनमोहनसिंग,प्रणव मुखर्जी,लालकृष्ण अडवाणी,यशवंत सिन्हा,अरुण जेटली यासारखे दिग्गज राज्यसभेवर निवडून गेले होते.खासदार मुन्नासाहेब महाडिक यांची निवड एकदम सार्थ असून या दिग्गजांच्या पंक्तीत आमच्या भीमा परिवाराच्या मुन्नासाहेबांची आज गणणा होत आहे ही बाब भीमा परिवाराच्या दृष्टिकोनातून अभिमानाची असून एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांच्या भव्य दिव्य कामगिरीस भीमा परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे राजकीय वजन निश्चित वाढले असून साखर उद्योगापुढील अडचणी शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्याला उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो.” अशी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया भीमा परिवाराचे संघटक समन्वयक तसेच सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना दिली. यावेळी भीमा परिवाराच्या सर्व सदस्यांनी या विजयाचा जेसीबीच्या साह्याने गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

याप्रसंगी व्हा.चे. सतीश अण्णा जगताप,सर्व संचालक अधिकारी व कामगार वर्ग सूर्यकांत शिंदे, शिवाजी गुंड पाटील,पांडुरंग ताटे, भारत पाटील,राजू बाबर,महादेव बाबर प्रा.राजकुमार पाटील,सुनील चव्हाण,माणिक बाबर संतोष चव्हाण विकिल चव्हाण ,बाबा साहेब पाटील,प्रशांत पाटील, प्रमोद जाधव झाकिर मुलानी,रहिमबक्श तांबोळी,माउली जाधव,भीमराव वसेकर,सिद्धेश्वर अनुसे,पोपट सोनटक्के,भाऊ वसेकर,किसनराव जाधव,बंडू शेख,शरिफ पैलवान,अन्सार पैलवान धनंजय देशमुख आदि मान्य वर ऊपस्थित होते.आरिफ पैलवान

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here